इंग्लंड दौऱ्यापूर्वी कॅप्टन कोहलीने घेतला कोरोना लसीचा पहिला डोस
देशात कोरोनामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण मोहीमेला सुरुवात करण्यात आली आहे. देशात 18 वर्षांवरील व्यक्तींना कोरोना प्रतिबंध लसीकरणाला परवानगी देण्यात आलेली आहे. तर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने देखील इंग्लंड दौऱ्याच्या पूर्वी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. विराट कोहलीने कोरोना लस घेतल्याचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. फोटो शेअर […]
ADVERTISEMENT
देशात कोरोनामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण मोहीमेला सुरुवात करण्यात आली आहे. देशात 18 वर्षांवरील व्यक्तींना कोरोना प्रतिबंध लसीकरणाला परवानगी देण्यात आलेली आहे. तर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने देखील इंग्लंड दौऱ्याच्या पूर्वी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे.
ADVERTISEMENT
विराट कोहलीने कोरोना लस घेतल्याचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. फोटो शेअर करताना त्याने फोटो कॅप्शन देखील दिलंय. या कॅप्शनच्या माध्यमातून त्याने सर्वांना लस घेण्याचं आवाहन केलं आहे. ‘कोरोना लस घेण्यासाठी पात्र असलेल्या सर्वांनी तातडीनं लस घ्यावी. त्यामुळे या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी मदत होईल.’ असं आवाहन विराटने केलं आहे.
हे वाचलं का?
कॅप्टन कोहली प्रमाणे उपकर्णधार अजिंक्य रहाणेने देखील कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. अजिंक्यसोबत त्याची पत्नी राधिका हिने देखील लसीचा पहिला डोस घेतला. अजिंक्यने ट्विटरवर फोटो शेअर करत पात्र असलेल्या सर्वांनी लस घ्यावी असं त्याने म्हटलंय.
Got my first dose of the vaccine today. I urge everyone to register and get yourself vaccinated, if you’re eligible pic.twitter.com/VH2xYcTQ1i
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) May 8, 2021
टीम इंडियाचा फास्ट बोलर इशांत शर्मा याने देखील त्याच्या पत्नीसह कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. इशांतने ट्विट करुन याची माहिती दिलीये. त्याचबरोबर त्याने लस देण्यासाठी काम करणाऱ्या सर्वांचे आभार मानलेत आणि सर्वांना लस घेण्याचं आवाहन केलं आहे.
ADVERTISEMENT
Thankful for this and grateful for all the essential workers. Happy to see the smooth running of the facility & management.
Let’s all get vaccinated at the earliest. #GetVaccinated #CovidVaccine pic.twitter.com/3wRHeBwvTP
— Ishant Sharma (@ImIshant) May 10, 2021
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT