Tokyo Olympic 2020 : बॅडमिंटनमध्ये P.V.Sindhu ला कांस्यपदक, चिनी खेळाडूवर मात
टोकियो ऑलिम्पिकमध्ये कोट्यवधी भारतीयांनी ठेवलेल्या अपेक्षाला साजेसा खेळ करत पी.व्ही. सिंधूने पदकाची कमाई केली आहे. सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर सिंधूने ब्राँझ पदकाच्या सामन्यात चीनच्या हे बिंग जिआओवर सरळ दोन सेटमध्ये मात करत सामना जिंकला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचं हे दुसरं पदक ठरलं. २१-१३, २१-१५ च्या फरकाने सरळ दोन सेट जिंकत सिंधूने कांस्यपदकाची कमाई केली. रिओ पाठोपाठ […]
ADVERTISEMENT

टोकियो ऑलिम्पिकमध्ये कोट्यवधी भारतीयांनी ठेवलेल्या अपेक्षाला साजेसा खेळ करत पी.व्ही. सिंधूने पदकाची कमाई केली आहे. सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर सिंधूने ब्राँझ पदकाच्या सामन्यात चीनच्या हे बिंग जिआओवर सरळ दोन सेटमध्ये मात करत सामना जिंकला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचं हे दुसरं पदक ठरलं. २१-१३, २१-१५ च्या फरकाने सरळ दोन सेट जिंकत सिंधूने कांस्यपदकाची कमाई केली. रिओ पाठोपाठ टोकियो ऑलिम्पिकमध्येही पदकाची कमाई करत सिंधूने स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध केलं.
एकाच खेळात ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं मिळवणारी सिंधू पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. याआधी कुस्तीत भारताकडून सुशीलकुमारने बिजींग आणि लंडन ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवलं होतं.
पहिल्या सेटमध्ये सिंधूने आश्वासक सुरुवात केली. सुरुवातीच्या काही क्षणांमध्ये सिंधूकडे ४-० अशी आघाडी होती. परंतू चीनच्या हे बिंग जिआओ ने चांगली झुंज देत सिंधूला बरोबरीत रोखलं. ४-० अशा आघाडीवर असलेल्या सिंधूशी बरोबरी करत हे बिंगने पहिल्या सेटमध्ये आघाडी घेतली. चिनी खेळाडूंच्या रणनितीसमोर सिंधू पुन्हा एकदा कमी पडते की काय असं वाटत असतानाच सिंधूने वेळेत स्वतः सावरलं.
आपल्या ठेवणीतले काही फटके वापरत सिंधूने मध्यांतरापर्यंत पुन्हा सामन्यात आघाडी घेतली. ११-८ अशा आघाडीनंतर पहिला सेट सुरु झाला. ज्यानंतर सिंधूने सामन्याची सूत्र आपल्या हातात घेतली. युवा चिनी खेळाडूला तिने कोर्टच्या दोन्ही बाजूला पळवत सुरेख वसूल केले. हे बिंगने सेटमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला खरा…परंतू सामन्यावर पकड मजबूत केलेल्या सिंधूने नंतर हे बिंगला पुनरागमन करण्याची संधीच न देता २१-१३ च्या फरकाने पहिला सेट जिंकला.









