Tokyo olympic: भारताला आणखी एक पदक मिळणार?, फायनलमध्ये प्रवेश करणारी Kamalpreet kaur कडून प्रचंड आशा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारताच्या कमलप्रीत कौरने टोकियो ऑलिम्पिकच्या डिस्कस थ्रो स्पर्धेत आपल्या कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. तिने आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. कमलजीतने तिसऱ्या प्रयत्नात 64 मीटर थ्रोसह अंतिम फेरीत स्थान मिळवले. जर कमलजीतने त्याच कामगिरीची पुनरावृत्ती केली तर ती अॅथलेटिक्समध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय बनू शकते.

ADVERTISEMENT

कारण आतापर्यंत अॅथलेटिक्समध्ये भारतातील कोणालाही पदक मिळवता आलेलं नाही. पण कमलप्रीत कौरने पात्रता फेरीत केलेल्या कडून पदकाच्या आशा वाढल्या आहेत. कमलप्रीत हिच्या नावावर नॅशनल रेकॉर्ड देखील जमा आहे.

पात्रता फेरीत भारताच्या कमलप्रीत कौरने दुसऱ्या प्रयत्नात 63.97 मीटर फेकली. पहिल्या प्रयत्नात तिची फेक 60.29 मीटर इतकी होती. पात्रता फेरीत ती दुसऱ्या स्थानी आहे. तिने ब गटातील पात्रता फेरीत ही चमकदार कामगिरी केली आहे. भारताच्या सीमा पुनिया गट अ पात्रता फेरीत सुरुवातीला सहाव्या स्थानावर होती. मात्र नंतर ती सोळाव्या स्थानी फेकली गेली ज्यामुळे तिला अंतिम फेरीत स्थान मिळवता आलं नाही.

हे वाचलं का?

कोण आहे कमलप्रीत कौर?

कमलप्रीत कौर पंजाबच्या श्री मुक्तसर साहिब जिल्ह्यातील बादल गावाची रहिवासी आहे. ती स्वतः सांगते की ती, अभ्यासात फार हुशार नव्हती. पण शाळेत सुरुवातीपासूनच ती स्पोर्ट्समध्ये चमकदार कामगिरी करायची. त्यामुळे तिच्या प्रशिक्षकाने तिला राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेण्यास सांगितले.

ADVERTISEMENT

तिथे तिची कामगिरी समाधानकारक होती आणि ती चौथ्या स्थानावर आली. अभ्यासात हुशार नसल्यामुळे कमलप्रीतला वाटले की, तिने खेळावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यानंतर तिने खेळाच्या मैदानात प्रवेश केला.

ADVERTISEMENT

2014 पासून खेळांबाबत गंभीर झाली

कमलप्रीत कौरने 2014 पासून खेळात अधिक रस दाखवला आणि तेच आपलं करिअर आहे याची खूणगाठ मनाशी बांधून त्याला गांभीर्याने घेतलं. तिचे प्राथमिक प्रशिक्षण तिच्याच गावातील भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) केंद्रात सुरू झाले. कमलप्रीतची मेहनत आणि तळमळ फळाला येऊ लागली. 2016 मध्ये ती 18 वर्षाखालील आणि 20 वर्षाखालील राष्ट्रीय विजेती ठरली.

Tokyo Olympic : Sindhu समोर आव्हान निर्माण करणारी Tai Tzu Ying आहे तरी कोण? जाणून घ्या…

‘हा’ विक्रम कमलप्रीतच्या नावावर नोंदवला गेला आहे

2019 मध्ये, दोहा येथे झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तिने पाचवे स्थान मिळवले होते. डिस्कस थ्रोमध्ये तिने 65 मीटर अडथळा पार केला आणि असे करणारी ती पहिली महिला ठरली. 2019 साली झालेल्या स्पर्धेत तिने 60.25 मीटर डिस्कस फेकून सुवर्णपदक पटकावले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT