Olympics 2020 : Tokyo मध्ये ‘बजरंगाची कमाल’, इराणी मल्लाला चितपट करत उपांत्य फेरीत धडक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एका पदकाची आशा निर्माण झाली आहे. भारताचा भरवशाचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने ६५ किलो वजनी गटात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पहिल्या फेरीत कझाकिस्तानच्या मल्लावर तर दुसऱ्या फेरीत इराणच्या मल्लाला चितपट करत बजरंगने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. दुपारी बजरंगचा उपांत्य फेरीचा सामना आहे, ज्यात त्याला अझरबैजानच्या खेळाडूचा सामना करायचा आहे.

ADVERTISEMENT

हा सामना जिंकल्यास बजरंगला अंतिम फेरीत प्रवेश मिळून भारताचं एक पदक निश्चीत होईल. हा सामना गमावल्यास बजरंगला रेपिचाज राऊंडमध्ये कांस्यपदकासाठी खेळावं लागेल.

पहिल्या फेरीत कझाकस्तानच्या एर्नाझार अकमातालिएव्हने बजरंगला चांगलीच झुंज दिली. ३-३ मिनीटांच्या दोन राऊंडमध्ये दोन्ही खेळाडूंनी एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेत फारसे पॉईंट दिले नाहीत. पहिल्या राऊंडमध्ये बजरंग ३ गुण तांत्रिक निकषाच्या आधारावर गमावले तर कझाकिस्तानच्या मल्लाला एकच गुण मिळवता आला. दुसऱ्या राऊंडमध्ये कझाकिस्तानच्या मल्लाने दोन गुणांची कमाई केली परंतू यासाठी त्याला चांगलीच मेहनत घ्यावी लागली. सामना संपताना ३-३ अशी बरोबरी झाल्यामुळे पंचांनी बजरंगच्या पारड्यात आपलं मत टाकलं.

हे वाचलं का?

Tokyo Olympics : पहिल्याच प्रयत्नात रवी कुमारचं ‘चंदेरी’ यश

दुसऱ्या राऊंडमध्ये बजरंगसमोर इराणच्या मोर्तेझा घैसीचं आव्हान होतं. इराणचा हा मल्ल बजरंगच्या तोडीस तोड खेळ करणारा होता, ज्यामुळ बजरंग सुरुवातीला चांगलाच पिछाडीवर पडला होता. पहिल्या राऊंडमध्ये इराणच्या मल्लाने तांत्रिक निकषावर १ गुण कमावत आघाडी घेतली. दुसऱ्या राऊंडमध्ये बजरंग पुनियाने चांगला प्रयत्न केला परंतू इराणच्या मल्लाचा बचाव हा भक्कम होता. सामना संपायला अखेरची काही मिनीटं शिल्लक असताना अखेरीस बजरंगने आपली हुकुमी डाव टाकत इराणच्या खेळाडूवर पकड बसवली आणि त्याला चितपट करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

ADVERTISEMENT

दुसरीकडे महिला कुस्तीत भारताच्या सीमाचं आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आलं. ट्युनिशीयाच्या सारा हमादीने तिच्यावर ३-१ ने मात केली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT