Tokyo Olympics 2020: स्वप्नभंग ! ब्रिटनची भारतीय महिलांवर मात, भारताचं पदक हुकलं
भारतीय पुरुष हॉकी संघाप्रमाणे ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवण्याचं भारतीय महिला संघाचं स्वप्न अखेरीस संपुष्टात आलेलं आहे. कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात ग्रेट ब्रिटनच्या संघाने भारतीय महिलांवर ४-३ ने मात करत पदक पटकावलं आहे. अतिशय अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात भारतीय महिलांनी पिछाडी भरुन काढत सामन्यात आघाडी घेतली होती. परंतू मोक्याच्या क्षणी झालेल्या काही चुकांमुळे भारतीय महिलांना हा सामना […]
ADVERTISEMENT

भारतीय पुरुष हॉकी संघाप्रमाणे ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवण्याचं भारतीय महिला संघाचं स्वप्न अखेरीस संपुष्टात आलेलं आहे. कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात ग्रेट ब्रिटनच्या संघाने भारतीय महिलांवर ४-३ ने मात करत पदक पटकावलं आहे. अतिशय अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात भारतीय महिलांनी पिछाडी भरुन काढत सामन्यात आघाडी घेतली होती. परंतू मोक्याच्या क्षणी झालेल्या काही चुकांमुळे भारतीय महिलांना हा सामना गमवावा लागाल.
भारतीय पुरुषांनी कांस्यपदकाच्या लढतीत बाजी मारल्यानंतर भारतीय महिला संघही ग्रेट ब्रिटनविरुद्ध अशीच कामगिरी करुन दाखवले अशी सर्वांना आशा होती. परंतू पहिल्या सत्रात दोन्ही संघ गोल करण्यात अपयशी ठरले. या सत्रात दोन्ही संघांनी काही सुरेख चाली रचल्या पण दोन्ही बाजूकडच्या बचावफळीने आपला गोलपोस्ट सुरक्षित ठेवला.
परंतू दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच ग्रेट ब्रिटनने गोलपोस्टवरची कोंडी फोडली. एलेना रायरने १६ व्या मिनीटाला मैदानी गोल करत ब्रिटनला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ग्रेट ब्रिटनच्या महिला दुसऱ्या सत्रात आक्रमक हॉकी खेळत भारतीय महिलांवर दबाव आणत होत्या. पहिल्या गोलच्या धक्क्यातून सावरण्याचा वेळ मिळतोय न मिळतोय तोच सारा रॉबिन्सनने २४ व्या मिनीटाला पुन्हा एकदा भारतीय संघाचा बचाव भेदत गोलकिपर सविता पुनियालाही चकवलं. ब्रिटनने अवघ्या काही मिनीटांमध्ये २-० अशी आघाडी घेतली.
परंतू भारतीय महिलांनी इथे खचून न जाता आपला खेळ सुरु ठेवला. २५ व्या मिनीटाला भारताला पेनल्टी कॉर्नरवर संधी मिळाली. ज्या संधीचं सोनं करत गुरजीत कौरने भारताचं खातं उघडलं. २६ व्या मिनीटाला आपलं आक्रमण धारदार करत भारताने आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळवला. गुरजीत कौरने या संधीचंही सोनं करत भारताला २-० अशी बरोबरी मिळवून दिली. भारतीय महिलांच्या या आक्रमणामुळे ग्रेट ब्रिटनच्या महिला पुरत्या भांबावून गेल्या. २९ व्या मिनीटाला वंदना कटारियाने आणखी एक गोल करत इंग्लंडच्या अडचणी आणखीनच वाढवल्या. काही मिनीटांपूर्वी ०-२ ने पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाने मध्यांतराला ३-२ अशी आघाडी घेतली.