Tokyo Olympics मध्ये घडला इतिहास, दोन खेळाडूंनी वाटून घेतलं Gold Medal

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत रविवारी पार पडलेल्या उंच उडी प्रकारात एक ऐतिहासीक घटना घडली आहे.

हे वाचलं का?

पुरुषांच्या उंच उडी प्रकारातील सुवर्णपदक हे संयुक्तरीत्या अव्वलस्थानी राहिलेल्या खेळाडूंच्या संमतीने वाटून देण्यात आले. ऑलिम्पिकमध्ये १९१२ नंतर अशी घटना प्रथमच घडली आहे.

ADVERTISEMENT

पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेच्या अंतिम फेरीत इटलीचा गियानमार्को तांबेरी आणि कतारचा मुताझ एस्ला बार्शिम या दोघांनी प्रत्येकी २.३७ मीटर उंच उडी मारताना अव्वल स्थान पटकावले.

ADVERTISEMENT

त्यानंतर दोघांनीही सुवर्ण पदकासाठी २.३९ मीटर उंच उडी मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोघांचे तिन्ही प्रयत्न अपयशी ठरले.

पंचांनी त्यांना आणखी एक जंप-ऑफ (प्रत्येकी एक संधी) मारण्याची आणखी एक संधी देऊ केली.

पंचांनी जंप-ऑफचा पर्याय सुचविल्यानंतर तांबेरी व बार्शिम यांनी पंचांना दोन सुवर्णपदके मिळू शकतात का? अशी विचारणा केली. त्याला पंच व सामधिकाऱ्यांनी याला होकार दर्शवला.

पंचांनी होकार दर्शवल्यानंतर दोन्ही खेळाडूंनी जल्लोष केला. या घटनेबाबत बोलताना बार्शिम म्हणाला, जंप-ऑफचा पर्याय विचारल्यानंतर आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिले. आम्ही विचार केला हे करण्याची काही गरज नाही व दोन सुवर्णपदकांची मागणी केली.

पोडिअमवर आल्यानंतर दोघांच्याही चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता.

दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना सुवर्णपदक घालत सन्मान केला.

दोन्ही खेळाडूंनी दाखवलेल्या या खिलाडूवृत्तीचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT