Tokyo Olympics 2020 : भालाफेकीत भारताला पदकाची आशा, नीरज चोप्रा अंतिम फेरीत दाखल
प्रशांत भट, प्रतिनिधी (टोकियो) टोकियो ऑलिम्पिकमध्ये Athletics प्रकारात भारताला आणखी एक पदकाची आशा आहे. भालाफेक प्रकारात भारताचा युवा खेळाडू नीरज चोप्राने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अ गटात खेळत असताना नीरज चोप्राने ८६.६५ मी. लांब भाला फेकत अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं. एकूण ३२ स्पर्धकांपैकी १६ स्पर्धकांना दोन-दोन गटात विभागण्यात आलं होतं. अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी […]
ADVERTISEMENT

प्रशांत भट, प्रतिनिधी (टोकियो)
टोकियो ऑलिम्पिकमध्ये Athletics प्रकारात भारताला आणखी एक पदकाची आशा आहे. भालाफेक प्रकारात भारताचा युवा खेळाडू नीरज चोप्राने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अ गटात खेळत असताना नीरज चोप्राने ८६.६५ मी. लांब भाला फेकत अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं. एकूण ३२ स्पर्धकांपैकी १६ स्पर्धकांना दोन-दोन गटात विभागण्यात आलं होतं.
अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी ८३.५० मी. चा निकष ठेवण्यात आला होता. नीरज चोप्राने हा निकष पूर्ण करत भारताला आणखी एका पदकाची आशा दिली आहे. २३ वर्षीय नीरज चोप्राने याआधी झालेल्या किमान १० आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताला पदक मिळवून दिलं आहे. त्यामुळे ऑलिम्पिकमध्येही नीरज भारताला पदकाची कमाई करुन देईल अशी आशा सर्वांना आहे.
नीरज चोप्राने आज केलेली कामगिरी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी मानली जात आहे. २०१७ सालच्या वर्ल्ड चॅम्पिअनशीप स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या जर्मनीच्या जोहान्स वेटेरला नीरज चोप्राने मागे टाकलं. ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी नीरज चोप्रा गेल्या काही वर्षांपासून तयारी करत होता. दरम्यान एकीकडे नीरज चोप्राने अंतिम फेरीत प्रवेश करुन भारताला पदकाची आशा दिली असली तरीही भारताचा आणखी एक खेळडू शिवपाल सिंग भालाफेकीत पात्रता फेरीतूनच बाहेर पडला आहे. त्यामुळे आता नीरज चोप्राचा भाला अंतिम फेरीत सुवर्णपदकाचा वेध घेणार का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.










