Tokyo Paralympics : अवनी लेखराला दुसरं पदक, ५०.मी एअर रायफल प्रकारात कांस्यपदकाची कमाई

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारताची महिला नेमबाज अवनी लाखेराने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी केली आहे. ५०. मी. एअर रायफल प्रकारात अवनीने भारताला आणखी एक कांस्यपदकाची कमाई करुन दिली आहे. या स्पर्धेतलं अवनीचं हे दुसरं पदक ठरलं. त्याआधी अवनीने भारताला १० मी. एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक मिळवून दिलं होतं.

पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिसाहात एकाच स्पर्धेत भारताकडून दोन पदकं जिंकणारी अवनी ही पहिलीच खेळाडू ठरली आहे. अवनीच्या पदकासह भारताच्या खात्यात आतापर्यंत १२ पदकांची नोंद झालेली असून पॅरालिम्पिक इतिहासातली ही आतापर्यंतची भारताची सर्वोत्तम कामगिरी मानली जात आहे.

१९ वर्षीय अवनी लाखेरा या अंतिम फेरीत चौथ्या क्रमांकावर होती. परंतू १०.५ गुणांची कमाई करत तिने तिसरं स्थान मिळवलं. अवनीच्या या कामगिरीमुळे युक्रेनची इर्याना चौथ्या स्थानावर घसरली. या अंतिम फेरीत चीनच्या खेळाडूने सुवर्ण तर जर्मनीच्या खेळाडूनं रौप्य पदकाची कमाई केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अंतिम फेरीत सुरुवातीच्या फेरींमध्ये अवनी सहाव्या स्थानावर फेकली गेली. परंतू यानंतर तिने आपल्या कामगिरीत सुधारणा करत भारताला किमान कांस्यपदक मिळेल याची काळजी घेतली. नेमबाजी व्यतिरीक्त या स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी थाळीफेक, भालाफेक, उंच उडी प्रकारातही पदकांची कमाई केली आहे.

ADVERTISEMENT

Tokyo Paralympics : उंच उडीत भारताच्या प्रवीण कुमारला रौप्यपदक

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT