US open 2021 : १८व्या वर्षी पटकावलं ग्रँडस्लॅम; एमा रादुकानूची ऐतिहासिक कामगिरी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ब्रिटेनच्या एमा रानुकानूने यूएस ओपन स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. यूएस ओपन महिला एकेरी स्पर्धेत १८ वर्षीय एमा रानुकादूने कॅनडाच्या १९ वर्षीय लेला फर्नाडिसचा पराभव करत यूएस ओपनचं विजेतेपद पटकावलं.

ADVERTISEMENT

२३ ग्रँडस्लम विजेत्या सेरेना विल्यम आणि एश्ले बार्टी यांच्या अनुपस्थितीत झालेल्या यूएस ओपन स्पर्धेत ब्रिटनच्या एमा रानूकानूने कौतुकास्पद कामगिरीची नोंद केली.

ब्रिटनची १८ वर्षीय एमा रानुकानू व कॅनडाची १९ वर्षीय लेला फर्नांडिस यांच्यात यूएस ओपन महिला एकेरीच्या विजेतेपदकासाठी अंतिम लढत झाली. या सामन्यात एमाने लेलाचा ६-४, ६३ असा पराभव करत ग्रँडस्लॅम पदकाला गवसणी घातली.

हे वाचलं का?

४४ वर्षानंतर एमा रानुकानने ब्रिटनला यूएस ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचं जिंकून दिलं आहे. यापूर्वी १९७७ मध्ये वर्जिनिया वेडने विंबल्डन स्पर्धेचं विजेतपद जिंकलं होतं. वेडने जीन किंगला पराभूत करत जेतेपद जिंकलं होतं. महत्त्वाचं म्हणजे रानुकानू २००४ नंतर सर्वात कमी वयात विजेतेपदक जिंकणारी खेळाडूही ठरली आहे.

२००४ मध्ये मारिया शारापोवाने सर्वात कमी वयात यूएस ओपन महिला एकेरीची विजेता ठरली होती. वयाच्या १७ व्या वर्षी मारियाने ही कामगिरी करून दाखवली होती.

ADVERTISEMENT

पदार्पणातच यूएस ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचणारी रानुकानू चौथी खेळाडू ठरली आहे. यापूर्वी पाम श्रायवर, विनस विल्यम्स, बियांका एंड्रिस्कू यांनी पदार्पणातच यूएस ओपनची अंतिम फेरी गाठली होती.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT