Virat kohli झाला दुसऱ्यांदा झाला बाबा, Anushka sharma ने दिली गुड न्यूज

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली दुसऱ्यांदा बाबा बनला आहे.  अभिनेत्री अनुष्का शर्माने एका मुलाला जन्म दिला आहे. त्यामुळे विराट आणि अनुष्का दुसऱ्यांदा पालक बनले आहेत.
virat kohli and anushka sharma blessed with baby boy sharma team india cricketer ind vs eng
social share
google news

Virat Kohli and Anushka sharma Blessed with Baby Boy :  टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली दुसऱ्यांदा बाबा बनला आहे.  अभिनेत्री अनुष्का शर्माने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. त्यामुळे विराट (Virat Kohli) आणि अनुष्का (Anushka sharma) दुसऱ्यांदा पालक बनले आहेत. या दोघांनीही एक पोस्ट शेअर करून याबाबतची माहिती शेअर केली आहे. यानंतर आता विराट कोहली आणि अनुष्कावर शुभेच्छांचा वर्षात होत आहे.  (virat kohli and anushka sharma blessed with baby boy sharma team india cricketer ind vs eng)

ADVERTISEMENT

विराट कोहली आणि अनुष्का शर्माने इस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून याबाबतची माहिती दिली आहे.  आम्हाला कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की, 15 फेब्रुवारी 2024 रोजी आम्ही आमच्या दुसऱ्या बाळाचा अर्थात वामिकाचा लहान भाऊ 'अकाय'चं स्वागत केलं आहे. आमच्या आयुष्यातील या गोड क्षणादरम्यान आम्हाला तुमच्या शुभेच्छा हव्या आहेत. कृपया आमच्या गोपनियतेचा आदर करा.प्रेम आणि कृतज्ञता, असे या पोस्टमध्ये लिहले आहे. 

हे ही वाचा : सुप्रीम कोर्टामुळे 'ऑपरेशन लोटस' फेल! विनोद तावडेंचा प्लॅन फसला?

हे वाचलं का?

दरम्यान विराट अनुष्काच्या या पोस्टवर आता अभिनेता रणवीर सिंह, अभिनेत्री सोनम कपूर, रकूल प्रीतसह अनेक कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. कलाकारांसह विराट आणि अनुष्काच्या चाहत्यांनी देखील त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

हे ही वाचा : Chhagan Bhujbal : 'मराठ्यांच्या ओबीसीतून आरक्षणाला आमचा सक्त विरोध'

ADVERTISEMENT

विराट आणि अनुष्का शर्माचे 11 डिसेंबर 2017 ला लग्न झालं होतं. दोघांचे लग्न इटलीच्या टस्कनीमध्ये पार पडलं होतं. या लग्नाला दोघांचे कुटूंब आणि मित्र परिवार सामील झाला होता. लग्नाच्या तीन वर्षानंतर म्हणजेच 11 डिसेंबर 2021 ला दोघांच्या घरी एका चिमुकलीचे आगमन झाले होते. या मुलीचे नाव वामिका ठेवण्यात आले होते. आता वामिकानंतर त्यांच्या घरी एका मुलाचे आगमन झाले आहे. त्याचे नाव अकाय ठेवण्यात आले आहे. अकायच्या जन्मानंतर दोघांवर आता दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT