Chandigarh Mayor : सुप्रीम कोर्टामुळे 'ऑपरेशन लोटस' फेल! विनोद तावडेंचा प्लॅन कसा फसला?
Chandigarh mayoral elections Supreme Court Verdict : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे भाजपला चंदीगड महापौर निवडणुकीत मोठा धक्का.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

भाजपला चंदीगड महापौर निवडणुकीत मोठा धक्का

सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

आपचे कुलदीप कुमार चंदीगडचे नवे महापौर
Supreme Court on Chandigarh Mayoral Elections : चंदीगड महापौर पदाची निवडणूक प्रतिष्ठेची केलेल्या भाजपला सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी (20 फेब्रुवारी )मोठा झटका बसला आहे. महापालिकेत मतपत्रिकांसोबत छेडछाड करून मते बाद ठरवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे सुप्रीम कोर्टानेच मतमोजणी करून निकाल जाहीर केला. न्यायालयाच्या निर्णयाने भाजपचा महापौर बसवण्यासाठी विनोद तावडेंनी सुरू केलेलं ऑपरेशन लोटस फेल ठरलं. (Supreme Court has given the judgement on the Chandigarh mayoral elections)
चंदीगडचे महापौर निवडणूक प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी झाली. आम आदमी पक्षाचे (आप) नगरसेवक कुलदीप कुमार यांनी महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत पीठासीन अधिकाऱ्याच्या 8 मते अवैध ठरविण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
सर्वोच्च न्यायालयाने काय दिला निकाल?
चंदीगड महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत निवडणूक अधिकाऱ्याने आपची आठ मते खोडखाड करून बाद ठरवली होती. हे सिद्ध झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने निवडणूक अधिकारी अनिल मसिह यांची खरडपट्टी केली.
त्यानंतर २० फेब्रुवारी रोजी निकाल दिला. निवडणूक अधिकाऱ्याने बाद ठरवलेली आठ मते सुप्रीम कोर्टाने वैध ठरवली. त्याचबरोबर ही मते आपचे महापौर पदाचे उमेदवार कुलदीप कुमार यांना पडलेली असल्याचेही निरीक्षण नोंदवलं.