IPL 2023, Virat Kohli : चुकीला माफी नाही… कोहलीला दणका! मोठी कारवाई
Virat Kohli ipl 2023 Fine : विराट कोहलीवर आयपीएलचे कोड ऑफ कडंक्टच (Code of Conduct) उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार त्याची 10 टक्के मॅच फी कट करण्यात येणार आहे.
ADVERTISEMENT
Virat Kohli ipl 2023 Fine : सोमवारी चेन्नई सुपर किंग्सने (CSK vs RCB) रॉयल चँलेजर्स बंगळूरु विरूद्धचा सामना 8 धावांनी जिंकला. या विजयानंतर विराट कोहलीला (Virat Kohli) मोठा धक्का बसला आहे. कारण विराट कोहलीवर आयपीएलचे कोड ऑफ कडंक्टच (Code of Conduct) उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार त्याची 10 टक्के मॅच फी कट करण्यात येणार आहे. ( virat kohli ipl 2023 fine match fees cut against csk ipl code of conduct)
ADVERTISEMENT
कोहलीने चूक केली मान्य
विराट कोहली (Virat Kohli) आयपीएल कोड ऑफ कंडक्टच्या (Code of Conduct) कलम 2.2 लेवलमध्ये दोषी आढळला होता. विराट कोहलीने आपला गुन्हा मान्य देखील केला आहे. चेन्नई विरूद्धच्या सामन्यात विराट कोहली मोठी खेळी करण्यात अपयशी ठरलाय. विराट निव्वळ 6 धावा करून चेन्नईच्या आकाश सिंहच्या बॉलवर क्लिन बोल्ड झाला. खरं तर विराट कोहलीने शिवम दुबेच्या आऊट झाल्यानंतर आक्रमक अंदाजात सेलिब्रेशन केले होते. या त्याच्या आक्रमक सेलिब्रेशनवर आक्षेप घेत त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. शिवम दुबेने पारनेलच्या बॉलवर सिराजच्या हातात कॅच दिली होती.
हेही वाचा : वडिलांनी नोकरी सोडली, कोचने खिल्ली उडवली; त्याने पहिल्याच सामन्यात दाखवून दिलं
आर्टिकल 2.2 काय आहे?
आयपीएल 2.2 नुसार सामन्या दरम्यान क्रिकेट उपकरणे किंवा कपडे, ग्राऊंड उपकरणे आणि फिटींगच्या दुरूपयोगा संदर्भातले आहे. याआधी अशाच आर्टीकल अंतर्गत आवेश खानवर देखील कारवाई करण्यात आली होती. आवेश खानने (Avesh Khan) बंगळूरू विरूद्ध विजय मिळवल्यानंतर हेल्मेट जमीनीवर फेकला होता.
हे वाचलं का?
स्लो ओव्हर रेटचे ‘हे’ खेळाडू शिकार
16 एप्रिलला मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सुर्यकुमार यादवच्या खांद्यावर होते.या सामन्यात स्लो ओवर रेट प्रकरणी सुर्यकुमार यादववर 12 लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. सुर्यासह गुजरातचा कर्णधार हार्दीक पंड्या, राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन, बंगळुरूचा कर्णधार फॅफ डूप्लेसीसवर स्लोओवर रेटप्रकरणी 12 लाखाचा दंड ठोठावला गेला होता.
हे ही वाचा : तब्बल 18 कोटी रुपयांचे बूट, अशी काय आहे खासियत?
विराटआधी ‘या’ खेळाडूंवर कारवाई
मुंबई इंडियन्स विरूद्धच्या सामन्यात कोलकत्ता नाईट रायडर्सचा कर्णधार नीतीश राणा आयपीएल कोड कंडक्टच उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळला होता. त्यामुळे त्याच्यावर मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावला होता. राणा आयपीएल कोड ऑफ कंड्क्ट 2.21 अंतर्गत लेवल एक मध्ये दोषी आढळला होता.
ADVERTISEMENT
मुंबई इंडियन्सच्या ऋतिक शौकीनला 10 टक्के दंड ठोठावण्यात आला होता. सामन्या दरम्यान नितीश आणि शौकीनमध्ये वाद झाला होता. शौकीनने आयपीएल कोड ऑफ कंड़क्ट 2.5 लेवल एक अंतर्गत दोषी आढळला होता.
ADVERTISEMENT
रविचंद्रन अश्विनही ठरला होता दोषी
आयपीएल कोड ऑफ कंड़क्टच्या (Code of Conduct) 2.7 अंतर्गत रविचंद्रन अश्विनही दोषी आढळला होता. त्यामुळे त्याच्यावर मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावला होता. चेन्नई विरूद्धच्या सामन्यात अश्विन अंपायरच्या निर्णयावर नाराज झाला होता. त्याच झांल अस होत की, अंपायरने अचानक सामन्यात बॉल बदली केला होता. अंपायरच्या या निर्णयाचा अश्विनने विरोध केला होता. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली होती.
हे ही वाचा : IPL च्या या नियमांमुळे खेळाडूंना बसतोय लाखोंचा फटका
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT