टीम इंडियाचा कॅप्टन Virat Kohli च राहणार ! BCCI ने नेतृत्वबदलाची शक्यता फेटाळली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

युएईत होणाऱ्या टी-२० विश्वचषकानंतर विराट कोहली भारतीय संघाचं कर्णधारपड सोडणार अशा बातम्या काही प्रसारमाध्यमांमध्ये आल्या होत्या. विराटकडे फक्त कसोटी संघाचं कर्णधारपद देऊन बीसीसीआय वन-डे आणि टी-२० संघाचं कर्णधारपद रोहितकडे सोपवणार असल्याच्या चर्चा सुरु होती. परंतू बीसीसीआयने या सर्व शक्यतांना पूर्णविराम दिला आहे.

ADVERTISEMENT

बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी विराट कोहलीच भारतीय संघाचा कर्णधार राहणार असल्याचं स्पष्ट केलंय.

हा सर्व मुर्खपणा सुरु आहे. असं काहीही होत नाहीये. ही सर्व चर्चा तुम्ही लोकं करत आहेत. कर्णधारपद विभागण्याच्या मुद्द्यावर बीसीसीआयचे अधिकारी भेटलेले नाहीत किंवा त्यांच्यात जराही चर्चा झालेली नाही. विराट कोहलीच भारताचा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये कॅप्टन राहणार आहे.

अरुण धुमाळ – बीसीसीआयचे खजिनदार (IANS वृत्तसंस्थेशी बोलत असताना)

हे वाचलं का?

World Test Championship मध्ये भारतीय संघ अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध हरल्यानंतर बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. यात रोहितकडे वन-डे आणि टी-२० संघाचं कर्णधारपद सोपवण्याबाबत चर्चा झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. परंतू धुमाळ यांनी अशी कोणतीही मिटींग झालेली नसल्याचं सांगितलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टी-२० विश्वचषकानंतर विराट कोहली स्वतःच आपण कर्णधारद सोडणार असल्याचं जाहीर करेल. त्याला आपल्या बॅटींगवर लक्ष केंद्रीत करणं गरजेचं असल्याचं वाटत असल्यामुळे तो हा निर्णय घेईल अशी माहिती सूत्रांनी दिली होती.

ADVERTISEMENT

विराट कोहली कर्णधारपद सोडणार?; टी-२० विश्वचषकानंतर टीम इंडियात होणार मोठे बदल

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT