Rohit Sharma : रोहितच्या ‘या’ 2 चुकांमुळे गेला World cup, गोलंदाजीवेळी झाली घोडचूक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Ind vs Aus Final : These 2 mistakes of Rohit Sharma took away the World Cup title
Ind vs Aus Final : These 2 mistakes of Rohit Sharma took away the World Cup title
social share
google news

Rohit Sharma Made Mistake in World Cup Final Match : आयसीसी एकदिवसीय विश्व चषक 2023 स्पर्धेचा शेवट भारतीय चाहत्यांसाठी खूप दुःखद राहिला. विश्व चषक स्पर्धेतील अखेरचा सामना रविवारी (19 नोव्हेंबर) अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडिया मानहाणीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला 6 विकेट्सनी दारूण पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने अवघ्या 240 धावाच केल्या. समालोचन करणाऱ्या आकाश चोप्रासह काही दिग्गज क्रिकेटपटूंना असे वाटले की ऑस्ट्रेलियाला 241 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी संघर्ष करावा लागेल, पण तसं काहीही घडलं नाही.

शमी-बुमराहने दडपण आणले, पण…

कांगारूंचा संघ जेव्हा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला आणि जसप्रीत बुमराहसह मोहम्मद शमीने भारतीय गोलंदाजीची कमान हाती घेतली, तेव्हा हीच गोष्ट खरी ठरल्याचे दिसून आले. शमीने डेव्हिड वॉर्नरची शिकार केली. यानंतर जसप्रीत बुमराहने मिचेल मार्श आणि स्टीव्ह स्मिथला बाद करून ऑस्ट्रेलियाला 47 धावांवर तिसरा धक्का दिला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Ind vs Aus Final Analysis: …म्हणून टीम इंडियाचा अंतिम सामन्यात झाला ‘गेम’, पराभवाची 5 मोठी कारणं

भारतीय संघ हा सामना जिंकू शकेल, असे चित्र यामुळे निर्माण झाले. पण त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने एक चूक केली, त्याने ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन यांच्यावरील सर्व दडपण दूर केले, जे डाव सांभाळण्याचा प्रयत्न करीत होते.

खरं तर, रोहितने शमी आणि बुमराहकडून 10 षटके गोलंदाजी करून घेतली. त्यानंतर त्याने रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव या फिरकीपटूंकडे चेंडू सोपवला. हेड आणि लॅबुशेन यांनी फिरकीपटूविरोधात चांगली खेळी केली. दोघांनी 16 षटकांत 3 बाद 87 धावांपर्यंत मजल मारली. म्हणजे या दोन्ही खेळाडूंनी दडपण बाजूला केले.

ADVERTISEMENT

फिरकीपटू ठरले अपयशी ठरले

कर्णधार रोहित शर्माने 17व्या षटकात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला आणले. पण, तोपर्यंत ऑस्ट्रेलियन फलंदाज सेट झालेले होते. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी सिराजच्या पहिल्या 3 षटकांत विकेट न देता 16 धावा केल्या. येथेही रोहितने तीन षटकांनंतर सिराजला गोलंदाजीच दिली नाही आणि पुन्हा दोन्ही बाजूंनी फिरकीपटू लावले.

ADVERTISEMENT

इथे एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे. ती म्हणजे तोपर्यंत कुलदीपने 6 षटकांत 30 धावा दिल्या होत्या आणि जडेजाने 4 षटकांत 16 धावा दिल्या होत्या. तसेच त्यांना एकही विकेट मिळाली नाही. त्यामुळे रोहितने कुठे चूक केली? तर रोहितने पहिल्या 10 षटकांनंतर शमी आणि बुमराहला काढले तेव्हा एका बाजूने सिराजकडून गोलंदाजी करून घ्यायला हवी होती.

हे ही वाचा >> Virat Kohli, Rohit Sharma Cry: रोहित-कोहलीच्या डोळ्यात अश्रू, सिराज मैदानाच रडला, पहा Video

दुसऱ्या बाजूने जडेजा किंवा कुलदीपचा वापर करता आला असता. त्यामुळे शमी-बुमराहने निर्माण केलेले दडपण सिराजला कायम ठेवता आले असते. त्यामुळे विकेट घेण्याची परिस्थिती निर्माण झाली असती. सिराजच्या 4-5 षटकांनंतर शमी किंवा बुमराहला फिरकीपटूंसोबत वापरता आले असते. अशाप्रकारे एका बाजूने वेगवान गोलंदाज आणि दुसऱ्या बाजूने फिरकीपटूंचा वापर करून कांगारू फलंदाजांवर दबाव कायम ठेवता आला असता.

रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापन खेळपट्टीबद्दल चुकले

याशिवाय भारतीय संघाने अनेक मोठ्या चुका केल्या आहेत. कमकुवत क्षेत्ररक्षण, फायनलचे दडपण न पेलणे, घरच्या प्रेक्षकांसमोर चांगली कामगिरी करण्याचे दडपण, रणनीती आणि आक्रमक फलंदाजी असे अनेक पैलू आहेत. पण आता कर्णधार रोहितच्या दोन मोठ्या चुकांबद्दल बोलत आहे. त्यातील एक आपण गोलंदाजीबद्दल बघितली.

आता दुसरी म्हणजे खेळपट्टी समजून घेण्यात झालेली चूक. नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी अंतिम सामन्यासाठी थोडी संथ आणि कोरडी ठेवण्यात आली होती. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने खेळपट्टीचे अचूक वाचन केले आणि सर्वांच्या मताच्या विरोधात जाऊन नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, रोहित म्हणाला होता की, जर मी नाणेफेक जिंकली असती तर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता. यातून रोहित आणि संघ व्यवस्थापनाला खेळपट्टी नीट समजून घेता आली नाही हे उघड आहे.

हे ही वाचा >> Ind vs Aus : विश्व कप विजेत्या ऑस्ट्रेलियावर पडला पैशाचा पाऊस, टीम इंडियाला किती कोटी मिळाले?

दुसरीकडे, कमिन्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि जोस हेझलवुडसह कटर आणि स्लोअर बॉलिंग करून भारतीय फलंदाजांना खूप त्रास दिला. यानंतर कांगारू संघ फलंदाजीला आला तोपर्यंत खेळपट्टी सपाट झाली होती. आउटफिल्डही वेगवान झाले होते. दव हे देखील एक मोठे कारण होते ज्यामुळे भारतीयांना गोलंदाजीत अडचणी आल्या.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT