World Cup 2023 Schedule: अहमदाबाद अंतिम सामन्याचा थरार! पाकिस्तान खेळणार का?
world cup 2023 schedule time table: क्रिकेटप्रेमी ज्याची चातकासारखी वाट बघतात, त्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तारखा अखेर समोर आल्या आहेत. आगामी विश्वचषक भारतात होणार असून, तारखा समोर आल्या आहेत. त्यामुळे वर्ल्ड कपची फायनल कधी आणि कुठे होणार हेही निश्चित झालं आहे. वर्ल्ड कप 5 ऑक्टोबरपासून सुरू होऊ शकतो, असं अशी माहिती समोर आलीये. (world cup 2023 […]
ADVERTISEMENT

world cup 2023 schedule time table: क्रिकेटप्रेमी ज्याची चातकासारखी वाट बघतात, त्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तारखा अखेर समोर आल्या आहेत. आगामी विश्वचषक भारतात होणार असून, तारखा समोर आल्या आहेत. त्यामुळे वर्ल्ड कपची फायनल कधी आणि कुठे होणार हेही निश्चित झालं आहे. वर्ल्ड कप 5 ऑक्टोबरपासून सुरू होऊ शकतो, असं अशी माहिती समोर आलीये. (world cup 2023 schedule, final match date)
एकदिवसीय विश्वचषकाच्या वेळापत्रकाबद्दलचं वृत्त इएसपीएन क्रिक इन्फो ने दिलं आहे. दिलेल्या वृत्तानुसार 10 संघाचा समावेश असलेल्या वर्ल्ड कपसाठी बीसीसीआयने जवळपास बारा ठिकाणं निश्चित केली आहेत.
बीसीसीआयने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी सर्वात मोठं स्टेडियम अर्थात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमचा यादीत समावेश केला आहे. त्यामुळे अहमदाबादमधील याच मैदानावर अंतिम फायनल होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.
Ind Vs Pak : पाकिस्तान 2023 चं वर्ल्ड कप खेळणार नाही? हे कारण आलं समोर









