World Cup 2023 Semi final Schedule: केव्हा आणि कुठे होणार विश्वचषक सेमीफायनल मॅच?

रोहित गोळे

ADVERTISEMENT

world cup 2023 semi final schedule ind vs na aus vs sa know when and where the world cup semi final battle will take place
world cup 2023 semi final schedule ind vs na aus vs sa know when and where the world cup semi final battle will take place
social share
google news

World Cup 2023 Semi final Schedule: भारतात सुरू असलेल्या एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेत टीम इंडियाचा उपांत्य फेरीत (Semi Final) मध्ये दिमाखात प्रवेश झाला आहे. स्पर्धेतील टॉप-4 संघ निश्चित झाले आहेत. ज्यामध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे बलाढ्य संघ एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. (world cup 2023 semi final schedule ind vs nz aus vs sa know when and where the world cup semi final battle will take place)

पाकिस्तान देखील उपांत्य फेरीच्या शर्यतीत होता, परंतु शनिवारी (11 नोव्हेंबर) कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील भारतात आलेल्या पाकिस्तान संघाला आता मायदेशी परतावं लागणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत अव्वल स्थानासह उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता सेमी-फायनलमध्ये भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध दोन हात करावे लागणार आहेत. हा तोच संघ आहे, ज्याने विश्वचषक 2019 च्या मँचेस्टर उपांत्य फेरीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा पराभव केला होता.

हे ही वाचा>> Time Out Controversy : “माझ्यासोबत…”, ‘टाइम आऊट’वर शाकिब अल हसनने सोडलं मौन

अशा स्थितीत रोहितकडे मागील सेमीफायनलचा वचपा घेण्याची मोठी संधी आहे. यावेळी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सेमीफायनल सामना 15 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. हे देखील रोहित शर्माचे होम ग्राउंड आहे. याच विश्वचषकात भारताने श्रीलंकेला 55 धावांत गुंडाळून तब्बल 302 धावांनी सामना जिंकला होता.

ADVERTISEMENT

कोलकातामध्ये चोकर्स आफ्रिकेचा कांगारूंशी सामना

यानंतर दुसरा उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी 5 वेळा विश्वचषक जिंकला आहे. तर आफ्रिकेचे हात नेहमीच रिकामे राहिले आहेत. त्यांना नेहमीच चोकर्स मानलं गेलं आहे.

ADVERTISEMENT

आफ्रिका संघाने अनेक वेळा चमकदार कामगिरी करत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. पण इथे ते चोकर्स असल्याचे अनेकदा सिद्ध झालं आहे. मात्र, यावेळी टेंबा बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिलं विजेतेपद पटकावण्याच्या इराद्याने खेळत आहे. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबर रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल.

विश्वचषकातील उपांत्य फेरीचे समीकरण

1. पहिला उपांत्य सामना

भारत विरुद्ध न्यूझीलंड – मुंबई (वानखेडे स्टेडियम) – 15 नोव्हेंबर

हे ही वाचा>> Video : अफगाणिस्तानच्या खेळाडूने दाखवला मनाचा मोठेपणा, गरिबांची दिवाळी केली गोड

2. दुसरा उपांत्य सामना

दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया – कोलकाता (ईडन गार्डन) – 16 नोव्हेंबर

 

विश्वचषकातील उपांत्य फेरीतील चारही संघ:

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा, रविचंद्रन अश्विन आणि शार्दुल ठाकूर.

न्यूझीलंड संघ: केन विल्यमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम (उपकर्णधार/विकेटकीपर), डॅरेल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी आणि विल यंग.

ऑस्ट्रेलियन संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, सीन अॅबॉट, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झॅम्पा, मिचेल स्टार्क.

दक्षिण आफ्रिकेचा संघ: टेम्बा बावुमा (कर्णधार), गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अँडिले फेहलुकवायो, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, रबरासी, रबाडा डसेन, लिझार्ड विल्यम्स.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT