WPL 2023 : मुंबई इंडियन्सची विजयी घोडदौड सुरूच: RCB चा केला दारुण पराभव

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Women’s primer league 2023 : महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये मुंबई इंडियन्स (MI) ची विजयी मोहीम सुरूच आहे. सोमवारी (06 मार्च) ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) 9 गडी राखून पराभव केला. रॉयल चॅलेंजर्सने विजयासाठी 155 धावांचे लक्ष्य दिले होते, जे मुंबई इंडियन्स संघाने 34 चेंडू बाकी असताना पूर्ण केले. (WPL 2023: Mumbai Indians’ winning streak continues: RCB suffer heavy defeat)

ADVERTISEMENT

मॅथ्यूज-ब्रंटसमोर आरसीबी चित

लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली आणि यास्तिका भाटियासह हेली मॅथ्यूजने पहिल्या विकेटसाठी 5 षटकांत 45 धावांची भागीदारी केली. यास्तिका भाटियाने प्रीती बोसच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू होण्यापूर्वी चार चौकारांच्या मदतीने 23 धावा केल्या. एक विकेट पडल्यानंतर, आरसीबीच्या चाहत्यांना आशा होती की त्यांचा संघ पुनरागमन करू शकेल, परंतु हेली मॅथ्यूज आणि नॅट सायव्हर-ब्रंट या जोडीने आरसीबीच्या गोलंदाजांवर तुटून पडल्यामुळे तसे झाले नाही.

WPL Kiran Navgire: सोलापूरच्या पोरीनं बॅटवर लिहलं धोनीचं नाव, ठोकलं अर्धशतक

हे वाचलं का?

दोन्ही खेळाडूंनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत सामना एकतर्फी केला. याचा परिणाम मुंबई इंडियन्सने 86 चेंडूत 159 धावा करून सामना जिंकला. हेली मॅथ्यूजने 38 चेंडूंत नाबाद 77 धावा केल्या, ज्यात 13 चौकार आणि 1 षटकार होता. त्याचवेळी इंग्लिश खेळाडू नॅट सिव्हर-ब्रंटने 29 चेंडूत नाबाद 55 धावा केल्या. नॅट सायव्हर-ब्रंटने आपल्या स्फोटक खेळीत नऊ चौकार आणि एक षटकार लगावला. सिव्हर-ब्रंट आणि मॅथ्यूज यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी नाबाद 114 धावांची भागीदारी झाली.

WPL 2023 : मुंबईची विजयी आरंभ, गुजरातला 143 धावांनी चारली धूळ

ADVERTISEMENT

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आरसीबीचा संपूर्ण संघ 18.4 षटकात 155 धावांवर गारद झाला. कर्णधार स्मृती मानधना आणि सोफी डिव्हाईन दोघींनी पहिल्या विकेटसाठी 39 धावा जोडल्या. मात्र यानंतर आरसीबीचा वेग कमी झाला आणि सातत्याने विकेट्स जात राहिल्या.यष्टीरक्षक रिचा घोषने सर्वाधिक 28 धावांची खेळी केली. त्याचवेळी स्मृती मानधना आणि श्रेयंका पाटील यांच्या बॅटमधून 23-23 धावा झाल्या. मुंबई इंडियन्सकडून हेली मॅथ्यूजने सर्वाधिक तीन बळी घेतले, तर एमिलिया केर आणि सायका इशाकने प्रत्येकी दोन बळी घेतले.

ADVERTISEMENT

मुंबई इंडियन्सचा हा सलग दुसरा विजय आहे

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा हा सलग दुसरा विजय आहे. विशेष म्हणजे पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा 143 धावांनी पराभव केला होता. महिला टी-20 क्रिकेटमधील धावांच्या बाबतीतही हा सर्वात मोठा विजय होता. दुसरीकडे, आरसीबीचा हा सलग दुसरा पराभव आहे. पहिल्या सामन्यात आरसीबीला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 60 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. आता 8 मार्च रोजी आरसीबीचा पुढील सामना गुजरात जायंट्सशी होणार आहे. तर 9 मार्च रोजी मुंबई इंडियन्सचा सामना दिल्ली कॅपिटलशी होणार आहे.

WPL 2023: हरमनप्रीतच्या तुफानी खेळीने रचला मुंबईच्या विजयाचा पाया

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT