रायन बर्ल कोण आहे?, ज्याने ऑस्ट्रेलियाच्या संघाचा तीन षटकात केला सुपडासाफ

मुंबई तक

ऑस्ट्रेलिया म्हणजे एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावणारा संघ. सध्या ऑस्ट्रेलियन संघांची परिस्थिती बरी नाहीये, पण तरीही या संघात कुठूनही, कधीही, कुठेही सामना जिंकण्याची ताकद आहे. या संघात अजूनही जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत, पण क्रिकेटमध्ये असे म्हटले जाते की हा अनिश्चिततेचा खेळ आहे, त्यात कधीही काहीही होऊ शकते. असाच काहीसा प्रकार शनिवारी घडला. झिम्बाब्वेसारख्या कमकुवत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

ऑस्ट्रेलिया म्हणजे एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावणारा संघ. सध्या ऑस्ट्रेलियन संघांची परिस्थिती बरी नाहीये, पण तरीही या संघात कुठूनही, कधीही, कुठेही सामना जिंकण्याची ताकद आहे. या संघात अजूनही जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत, पण क्रिकेटमध्ये असे म्हटले जाते की हा अनिश्चिततेचा खेळ आहे, त्यात कधीही काहीही होऊ शकते. असाच काहीसा प्रकार शनिवारी घडला. झिम्बाब्वेसारख्या कमकुवत संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. झिम्बाब्वेच्या या विजयाचा हिरो होता फिरकी गोलंदाज रायन बर्ल. कोण आहे रायन बर्ल? त्यानं ही कामगिरी कशी केली?.

तीन षटकं, 10 धावा अन्…, रायन बर्लची कामगिरी

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर रायनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त तीन षटके टाकली आणि 10 धावांत पाच बळी घेतले. या लेगस्पिनरने ग्लेन मॅक्सवेल, डेव्हिड वॉर्नरसारख्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. त्याच्या शानदार गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियन संघ 141 धावांत गुंडाळला गेला आणि झिम्बाब्वेने सात गडी राखून लक्ष्य गाठले.

रायन बर्ल प्रतिभावान आहे, ज्यानं अनेक गेम खेळले आहेत. त्याने स्क्वॉश, हॉकी आणि अॅथलेटिक्समध्ये झिम्बाब्वेच्या कनिष्ठ संघांचे प्रतिनिधित्व केलं आहे. पण त्याला क्रिकेटवर विशेष प्रेम होते आणि झिम्बाब्वे राष्ट्रीय संघात तो यशस्वी ठरला. दुखापतीमुळे तोही हैराण झाला आहे. इंग्लंडमध्ये लीग मॅच खेळताना त्याच्या खांद्याला दुखापत झाली आणि तो बराच काळ क्रिकेटपासून दूर होता.

रायन बर्लनं आंतरराष्ट्रीय संघात कधी प्रवेश केला?

2012 मध्ये झिम्बाब्वेच्या अंडर-19 विश्वचषक संघाचा भाग होता. तो 2014 मध्ये अंडर-19 विश्वचषकही खेळला होता. 2017 मध्ये, त्याने झिम्बाब्वेसाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याच वर्षी त्याने कसोटी पदार्पण केले. एका वर्षानंतर, तो टी-20 च्या संघात पदार्पण करण्यातही यशस्वी ठरला.

हे वाचलं का?

    follow whatsapp