श्रीलंकेचा क्रिकेटर दनुष्का गुणतिलकला ऑस्ट्रेलियात अटक, बलात्काराचा आरोप

जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण?
T20 World Cup Sri Lanka Cricketer Danushka Gunathilaka Arrested In Rape Case In Sydney
T20 World Cup Sri Lanka Cricketer Danushka Gunathilaka Arrested In Rape Case In Sydney

ऑस्ट्रेलियातील टी २० वर्ल्डकप स्पर्धेत सहभागी झालेला श्रीलंकेचा क्रिकेटर दनुष्का गुणतिलका याला अटक करण्यात आली आहे. बलात्काराच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. शनिवारी दनुष्का गुणतिलकाने त्याचा शेवटचा सामना खेळला आहे. ऑस्ट्रेलियन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार बलात्काराच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. श्रीलंकेचा संघ मायदेशी परतला आहे.

काय आहे प्रकरण?

डेटिंग अॅपच्या माध्यमातून भेट झालेल्या २९ वर्षीय तरूणीने दनुष्का गुणतिलकावर बलात्काराचा आरोप केला आहे. सिडनीमध्ये गेल्या आठवड्यात ही घटना घडली आहे. याप्रकरणी दनुष्काला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. २९ वर्षांच्या तरूणीने तिच्या घरात तिच्यावर बलात्कार झाल्याची तक्रार दिली आहे. यानंतर स्टेट क्राइम कमांड आणि पोलिसांनी संयुक्तपणे तपास केला असंही ऑस्ट्रेलियन माध्यमांनी म्हटलं आहे.

अटकेच्या कारवाईनंतर श्रीलंका संघ त्याला मागे सोडून मायदेशी रवाना झाला आहे. टी-२० वर्ल्डकपसाठी श्रीलंका संघासह ऑस्ट्रेलिया दाखल झालेला गुणतिलका जखमी झाल्याने संघाबाहेर गेला होता. अशीन बंडाराने संघात त्याची जागा घेतल्यानंतरही तो संघासह थांबला होता.

गुणतिलकाने १०० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये नुकतंच नामिबियाविरोधात खेळलेल्या टी-२० सामन्याचाही समावेश आहे. या सामन्यात संघाचा पराभव झाला होता. गुणतिलकावर २०१८ मध्येही असाच आरोप झाला होता. यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. पण तपासानंतर पोलिसांनी त्याची सुटका केली होती आणि त्याच्या मित्राला अटक केली होती.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in