अनोळखी व्यक्तीनं बनवला विराट कोहलीच्या रूमचा व्हिडीओ; अनुष्का भडकली
भारतीय क्रिकेट संघ T20 विश्वचषक खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात उपस्थित आहे. पण विराट ज्या हॉटेलमध्ये मुक्कामाला आहे तिथे त्याच्यासोबत असे काही घडले, ज्याचा लोक निषेध करत आहेत. हॉटेलच्या कर्मचार्यांनी विना परवानगी विराटच्या खोलीत प्रवेश करून खोलीचा व्हिडिओ बनवला आणि नंतर तो सोशल मीडियावर शेअर केला. या कृतीवर विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने प्रतिक्रिया दिली आहे. […]
ADVERTISEMENT

भारतीय क्रिकेट संघ T20 विश्वचषक खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात उपस्थित आहे. पण विराट ज्या हॉटेलमध्ये मुक्कामाला आहे तिथे त्याच्यासोबत असे काही घडले, ज्याचा लोक निषेध करत आहेत. हॉटेलच्या कर्मचार्यांनी विना परवानगी विराटच्या खोलीत प्रवेश करून खोलीचा व्हिडिओ बनवला आणि नंतर तो सोशल मीडियावर शेअर केला. या कृतीवर विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने प्रतिक्रिया दिली आहे. असे कृत्य करणाऱ्याला तिने जोरदार खडसावले आहे.
हॉटेल कर्मचाऱ्यांच्या या कृत्यामुळे अनुष्का भडकली
हॉटेल कर्मचाऱ्यांच्या या कृत्याचा विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. सर्वप्रथम विराटने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर चाहत्याने बनवलेला व्हिडिओ शेअर करून आपला राग व्यक्त केला. विराटनंतर आता त्याची पत्नी अनुष्का शर्मानेही या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. अनुष्का शर्माने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर विराट कोहलीची पोस्ट शेअर करून या कृत्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. अनुष्काने गोपनीयतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
अनुष्काने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, अनेक वेळा अशा घटनांना सामोरे जावे लागले आहे. परंतु ही गोष्ट मूर्खपणाचा कळस आहे. हे सहन केले जाऊ शकत नाही आणि ज्यांना वाटते की जर तुम्ही सेलिब्रिटी असाल तर तुम्हाला डील करावे लागेल, तर त्यांनी समजून घेतले पाहिजे की तुम्हीच या समस्येचे कारण आहात. अशा लोकांना सूचना देत अनुष्का शर्माने लिहिले आहे की, स्वत:वर थोडेसे नियंत्रण असले पाहिजे. अनुष्काने विचारले, हे सर्व तुमच्या बेडरूममध्ये होत असेल तर लाइन काय आहे?