Rajyog 2025 : तब्बल 12 वर्षांनंतर दुर्मिळ राजयोग, 'या' राशींच्या लोकांचे खिस्से कधीच राहणार नाहीत रिकामे

Astrology 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार 2025 या वर्षात अतिशय उत्तर योग असणार आहेत. सर्वाधिक गजललक्ष्मी राजयोगाचा प्रभाव तीन राशींवर असणार आहे. हा योग तब्बल 12 वर्षांनंतर आला आहे. ज्याचा फायदा आता तीन राशींना होणार आहे.

Astrology 2025 Rajyog Gajala Lakshmi Benefits for these three zodiac signs

Astrology 2025 Rajyog Gajala Lakshmi Benefits for these three zodiac signs

मुंबई तक

23 May 2025 (अपडेटेड: 23 May 2025, 01:20 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

ज्योतिषशास्त्रानुसार 2025 या वर्षात अतिशय उत्तर योग असणार आहेत.

point

सर्वाधिक गजललक्ष्मी राजयोगाचा प्रभाव तीन राशींवर असणार आहे.

Astrology 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार 2025 या वर्षात अतिशय उत्तम योग असणार आहेत, ज्याला गजललक्ष्मी राजयोग असेही म्हणतात. हा योग तब्बल 12 वर्षांनंतर आला आहे. ज्याचा फायदा आता तीन राशींना होणार आहे. काही राशींसाठी हा योग अधिकाधिक शुभ मानला जातो. याबाबत एकंदरीत माहिती जाणून घेऊयात. 

हे वाचलं का?

गुरु आणि शुक्र हे दोन्ही ग्रह अधिकाधिक शक्तिशाली आहेत. दरम्यान, गुरुला एका राशीत येण्यासाठी तब्बल 12 वर्षे लागतात तर शुक्राला त्याच राशीत परत येण्यासाठी 12 महिन्यांचा कालावधी लागतो. हे दोन्ही ग्रह जेव्हा एकत्रित येतात तेव्हा एक विशेष योग प्राप्त होतो, ज्यामुळे जीवनात चांगले बदल निर्माण होतात. 

हेही वाचा : अटक केली की आरोपी स्वत:हून हजर झाले? सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले 3 सवाल

दरम्यान, गुरु 14 रोजी रात्रीच्या वेळी 11.20 वाजेदरम्यान मिथून राशीत प्रवेश करेल. त्यानंतर 26 जुलै रोजी शुक्र मिथून राशीत प्रवेश करेल. जेव्हा दोन्ही राशींमध्ये ग्रह एकत्र येतील तेव्हा गजललक्ष्मी राजयोग निर्माण होईल. ही स्थिती 21 ऑगस्टपर्यंत राहिल, त्यानंतर शुक्र हा कर्क राशीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. 

जेव्हा गुरु आणि शुक्र पहिल्या, चौथ्या किंवा सातव्या घरात समोरासमोर असतात तेव्हा गजलक्ष्मी राजयोग निर्माण होईल. या राजयोगाद्वारे संबंधित तीन राशींच्या लोकांना धन, समाजात मान सन्मान, आनंद मिळू शकतो. या योगामुळे जीवनात यश आणि प्रगती मिळू शकते. ज्या तीन राशींचा  गजललक्ष्मी राजयोग निर्माण होणार आहे. त्या राशींबाबत माहिती जाणून घेऊयात.

'या' तीन राशींन होणार फायदा 

मिथून : मिथून राशींच्या लोकांसाठी हा काळ शुभ असणार आहे. मुलांशी संबंधित समस्या सोडवल्या जाणार आहेत. त्यानंतर उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. या काळामध्ये घेतलेला कोणताही निर्णय मिथून राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. अशावेळी भाग्य तुम्हाला साथ देणार आहे. 

सिंह : सिंह राशींच्या लोकांना या योगाचा मोठा फायदा निर्माण होणार आहे. नोकरी आणि व्यवसायात मोठं यश होईल. कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण होणार आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम असेल. भविष्यासाठी पैसे वाचवण्यास मोठा फायदा निर्माण होईल. मोठ्या कामाची जबाबदारी चालून येणार आहे. 

हेही वाचा : हगवणेंसारखेच प्रताप, प्रत्येक वादात त्याचं नाव, कोण आहे निलेश चव्हाण?

कुंभ : कुंभ राशीसाठी हा काळ मोठा फायदेशीर आणि खास असणार आहे. 5 ते 11 मे दरम्यान तुम्हाला करिअर, शिक्षण आणि पैशांबाबत चांगली बातमी मिळणार आहे. नोकरीत आणि पगारवाढीची संधी मिळणार आहे. तुम्हाला नवीन काम मिळवण्यासाठी आणि पैसे कमवण्यासाठी अनेक संधी मिळण्याची शक्यता आहे. 


 

    follow whatsapp