'मुकेश अंबानींच्या जन्मादिवशी दहा हजार लोक जन्मले...' अंकशास्त्रज्ञांनी काय सांगितलं?

मुंबई तक

• 08:00 AM • 26 Jul 2026

Navneet Mandhani : अंकशास्त्रज्ञ नवनीत मनधानी यांनी नुकतीच मुंबई तक माध्यमाला मुलाखत दिली होती. यावेळी बोलताना त्यांनी राजकीय नेत्यांच्या स्वाक्षरीबाबत, तसेच एकाच दिवशी जन्मलेल्या लोकांच्या आयुष्याबाबत माहिती दिली आहे. तसेच त्यांनी मुकेश अंबानीचं उदाहरण देत अंकशास्त्रज्ञाची माहिती दिली.

Navneet Mandhani

Navneet Mandhani

Google CTA

बातम्या हायलाइट

point

'योगायोग कधीतरी होतो'

point

मुकेश अंबानींचं उदाहरण देत काय सांगितलं अंकशास्त्रज्ञाने? 

Navneet Mandhani : अंकशास्त्रज्ञ नवनीत मनधानी यांनी नुकतीच मुंबई तक माध्यमाला मुलाखत दिली होती. यावेळी बोलताना त्यांनी राजकीय नेत्यांच्या स्वाक्षरीबाबत, तसेच एकाच दिवशी जन्मलेल्या लोकांच्या आयुष्याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, "मी पाच नावं अशी सांगेन, त्यांच्याबाबत नेमकं काय एकसारखं आहे हे पाहूयात. जनरल बिपिन रावत, राजेश पायलट, संजय गांधी, गोपीनाथ मुंडे आणि नंतर माधवराव सिंधिया हे पाचही जणांचे अपघाती निधन झाले होते. अंकशास्त्रानुसार यांचा मूलांक हा चारच असल्याचे त्यांनी सांगितले.  

हे वाचलं का?

हे ही वाचा : कॉक्रोज जनता पार्टीच्या सरकारकडून मागण्या मान्य, लिखित पत्र अन् आंदोलन मागे

'योगायोग कधीतरी होतो'

"अजितदादांचं ज्या दिवशी निधन झालं, तेव्हाचा मूलांक हा आठ होता. त्यांच्या नावाचा नंबर देखील आठवरतीच जातो, योगायोग कधीतरी होतो, सातत्याने योगायोग होत नाही. यासाठी अंकशास्त्रात क्रमांकाला अधिक महत्त्वाचे मानले जाते. हाच नंबर जर आपण योग्यरित्या वापरला तर त्याचा चांगला परिणाम होतोय. नातेसंबंधात देखील याला महत्त्व असते", असे नवनीत मनधानी म्हणाले. 

मुकेश अंबानींचं उदाहरण देत काय सांगितलं अंकशास्त्रज्ञाने? 

एकाच दिवशी जन्मलेले इतरही लोक आहेत, ते आजही हयात असतील, मात्र अजिदादांचं दुर्दैवीपणे निधन झालंय. एकाच दिवशी जन्मलेली व्यक्ती असूनही त्यांची परिस्थिती ही कुठेतरी वेगळी पाहायला मिळते, असा प्रश्न करण्यात आला, त्यावर मानधानी म्हणाले, "ज्या दिवशी मुकेश अंबानी जरी जन्माला आले असले तरीही, तेव्हा देशात दहा हजार लोक जन्मले असतील. त्यावेळी दहा हजार मुकेश अंबानी जन्माला आले असतील. त्यात तुमचा प्रारब्धाचा एक भाग असतो," असं मनधानी म्हणाले.  

हे ही वाचा : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता ठाकरे बंधूंचा मोर्चा निघणार की नाही? ठाकरेंकडून मोठी घोषणा!

पुढे ते म्हणाले की, "तुमच्या नावाची स्पेलिंग असते त्याची महत्त्वाची भूमिका असते",त्यांनी एका दाम्पत्यांच्या जुळ्या मुलींबाबत सांगितलं की,  "एका मुलीला कॅन्सर झाला होता, तर दुसरी मुलगी व्यवस्थित होती. सांगायचं काय तर एकाच वेळी जन्माला आलेल्या मुलांबाबत आई-वडिलांचे भाग्य काय आहे हे ठरवत असते ", ही माहिती त्यांनी मुलाखतीतून दिली.