ADVERTISEMENT
Navniit Manadhaani : मुंबई तक बैठक नुकतीच पार पडली होती. याच बैठकीत अंकशास्त्रज्ञ नवनीत मानधनी यांनी बैठकीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून मुलाखत दिली होती. या मुलाखतीत आगामी तरुण मुख्यमंत्री, तसेच मंत्र्यांच्या स्वाक्षरीवरून त्यांचे गुण आणि स्वभावाबाबत सांगितलं. तसेच त्यांनी मूलांकावरून त्यांचा स्वभाव, कौशल्य लाभ, तोटा आणि त्यांच्या शत्रूत्वाबाबतची माहिती दिली आहे.
हे ही वाचा : तुम्हाला माहितीए 'या' 3 आंदोलनांनी अवघ्या भारताचं राजकारणचं कसं बदललं?
मूलांक एक
मूलांक एक असलेल्या व्यक्तींमध्ये राहुल गांधींचं नाव येते. त्यांच्याकडे लीडरशीप चांगली असते, ते प्रो. अॅक्टिव्ह असतात. ते ध्येयवेडे असतात. त्यांच्या अहंकार दुखवू नये, जर त्यांचा अहंकार दुखावला तर त्यांच्या इतक वाईट दुसरा कोणीच असू शकत नाही, एक मूलांक असलेल्या व्यक्तीचे आठ मूलांक असलेल्या व्यक्तीशी जमत नाही, असं अंकशास्त्रज्ञ नवनीत मानधानी यांनी सांगितलं.
मूलांक दोन
मूलांक दोन असणाऱ्या लोकांबाबत सांगताना ते म्हणाले की, हे लोक अगदीच संवेदनशील असतात, त्यांचे पौर्णिमा आणि अमावस्येला मूड स्विंग्स होत असतात. त्यांना फार कशाचीच अपेक्षा नसते, त्यांना समजून घेणारी व्यक्तीची गरज असते. त्यांचे मूलांक 9 असलेल्या व्यक्तीशी कधीच जुळत नाही.
मूलांक तीन
मूलांक तीन असलेल्या लोकांना ज्ञान असते. जगातील ज्ञान घेऊन तेच ज्ञान थोडसं लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. त्यांनी काही गोष्टी लोकांना सांगू नये, जेणेकरून त्यांचा प्लान फिस्कटू देखील शकतो. या लोकांचं सहा मूलांक असलेल्या लोकांशी जुळत नाही.
मूलांक चार
मूलांक चार असलेल्या लोकांच्या आयुष्यातील कष्ट हे कधीच संपत नाहीत. दररोज त्यांना नवीन चॅलेंज समोर येत असतं. मात्र एखाद्या तरी मित्र मूलांक चार असणारा असावा, कारण तो कधीही अर्धवट उत्तर देत नाही. चारचं मूलांक सात असणारे समजून घेतात.
हे ही वाचा : 'पोलीस माझ्या कानात म्हणाले हे सरकार हटवा', राहुल गांधींनी सगळंच सांगितलं! राडा झाला तेव्हा काय घडलं?
मूलांक पाच
मूलांक पाच क्रमांकचे लोक हे संवाद चांगले साधतात, त्यांचे फार कमी शत्रू निर्माण होतात. यामुळे त्यांचे इतरांशी चांगले मैत्रीपूर्वसंबंध निर्माण होतात. संवादाचं कौशल्य असल्यास तो त्याच मार्गाने पैसे कमावू शकेल.
ADVERTISEMENT












