मित्रांसोबत अचानक प्लॅन बनतो... ‘चल, आज बाहेर जाऊया!’ म्हणत सुरुवात होते आणि काही तासांत 500-1000 रुपयांचा खर्च सहज होतो. कधी रेस्टॉरंट, कधी कॅफे, कधी मूव्ही, कधी कॅब... आणि शेवटी बिल पाहिल्यावर लक्षात येतं की ठरवलेल्या बजेटपेक्षा बराच जास्त खर्च झालाय.
ADVERTISEMENT
हा फक्त ‘जास्त खर्च’ करण्याचा विषय नाही. अनेकदा मित्रांचा ग्रुप, सोशल प्रेशर, इतरांचं अनुकरण आणि त्या क्षणी बजेटचा विचार न करण्याची सवय यामुळे Social Spending वाढतं.
महिन्याच्या सुरुवातीला बचतीचं लक्ष्य ठरवूनही महिनाअखेरीस पैसे कमी पडत असतील, तर तुमच्या खर्चाच्या यादीत Social Spendingचा वाटा किती आहे, हे एकदा तपासणं गरजेचं आहे. जाणून घेऊया मित्रांसोबत असताना Budget का बिघडतं?
1. ‘सगळे खर्च करतायत, आपणही करूया’ हा दबाव
ग्रुपमध्ये बहुतेक जण एखाद्या महागड्या रेस्टॉरंटमध्ये जाण्याचं ठरवतात. तुमच्या मनात मात्र बजेट असतं. पण ‘नाही’ म्हटलं तर आपण वेगळे दिसू, मित्र काय म्हणतील, असा विचार होतो. आणि मग बजेट बाजूला राहतं. याला Social Pressureचा प्रभाव म्हणता येईल.
2. ‘आजचं काय, पुढच्या महिन्यात बघू’ मानसिकता
मित्रांसोबत एन्जॉय करताना भविष्यातील खर्चाचा विचार मागे पडतो. आज ₹1,000 जास्त खर्च झाले तर फार काही फरक पडणार नाही, असं वाटतं. पण महिन्यात असे चार प्रसंग आले तर अतिरिक्त खर्च ₹4,000 होऊ शकतो. म्हणजे वर्षभरात अशाच खर्चातून हजारो रुपये जाऊ शकतात.
3. इतरांच्या Lifestyleची नक्कल
सोशल मीडिया आणि मित्रांच्या सर्कलमुळे आपल्याला इतरांचा Lifestyle सतत दिसतो. कोणी महागड्या कॅफेमध्ये जातं... कोणी विकेंडला ट्रिपला जातं... कोणी नवीन फोन घेतो... कोणी महागड्या रेस्टॉरंटमध्ये पार्टी करतो... आणि नकळत आपल्या मनात तुलना सुरू होते. ‘आपणही हे करू शकतो’ किंवा ‘आपण मागे पडतोय’ असा विचार होऊ शकतो. यातून Lifestyle Inflation वाढू शकते.
4. बिल शेअर करताना होणारा अतिरिक्त खर्च
ग्रुपमध्ये बिल आल्यानंतर प्रत्येकाचा खर्च समान नसतो. एखाद्याने कमी खाल्लं, तर दुसऱ्याने जास्त ऑर्डर केली असेल. पण बिल समान वाटून घेतलं गेलं तर तुम्ही प्रत्यक्षात घेतलेल्या वस्तूंपेक्षा जास्त पैसे देऊ शकता. अशा वेळी आधीच बिल कसं शेअर करायचं हे ठरवलं तर अनावश्यक खर्च टाळता येतो.
Social Spendingसाठी वेगळं Budget ठेवा
मित्रांसोबत फिरणं पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. त्याऐवजी महिन्याच्या Budgetमध्ये Social Spendingसाठी स्वतंत्र रक्कम ठेवा. उदाहरणार्थ, तुमचं मासिक उत्पन्न ₹50,000 असेल तर तुम्ही स्वतःच्या परिस्थितीनुसार Social Activitiesसाठी ठरावीक रक्कम आधीच बाजूला ठेवू शकता. ही रक्कम संपली तर पुढचा खर्च पुढच्या महिन्यात करायचा. यामुळे मित्रांसोबत एन्जॉयही करता येईल आणि बजेटही नियंत्रणात राहील.
‘हो’ म्हणण्याआधी 3 प्रश्न विचारा
मित्रांसोबत अचानक महागडा प्लॅन ठरला तर लगेच हो म्हणण्याआधी स्वतःला तीन प्रश्न विचारा.
1. हा खर्च माझ्या Budgetमध्ये आहे का?
2. हा खर्च केल्यानंतर महिन्याच्या आवश्यक खर्चावर परिणाम होणार आहे का?
3. मला खरंच या गोष्टीचा आनंद घ्यायचा आहे की फक्त ग्रुपसोबत राहण्यासाठी मी खर्च करतोय?
या तीन प्रश्नांची उत्तरं स्पष्ट असतील तर निर्णय घेणं सोपं होतं.
ADVERTISEMENT












