Personal Finance Home Interior Budget Tips: स्वतःचं घर हे प्रत्येक पगारदार व्यक्तीचं मोठं स्वप्न असतं. मात्र, घराची खरेदी पूर्ण झाल्यानंतर अनेक जण इंटिरिअरवर मोठी रक्कम खर्च करतात. आकर्षक फर्निचर, मॉड्युलर किचन, वॉर्डरोब, फॉल्स सिलिंग, लाईटिंग आणि डेकोरेशन यासाठी अनेकदा लाखो रुपयांचा खर्च केला जातो. परिणामी, आधीच सुरू असलेल्या होम लोनच्या EMI सोबत इंटिरिअर लोनचा अतिरिक्त भार येतो आणि मासिक बजेट कोलमडू शकते.
ADVERTISEMENT
त्यामुळे घर घेतल्यानंतर इंटिरिअरचे आर्थिक नियोजन करणे तितकेच महत्त्वाचे आहे.
इंटिरिअरवर किती खर्च करणे योग्य?
आर्थिक तज्ज्ञांच्या मते, इंटिरिअरचा खर्च हा घराच्या किंमतीच्या 8 ते 15 टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवणे अधिक सुरक्षित मानले जाते.
* घराची किंमत 50 लाख रुपये असेल तर इंटिरिअर बजेट सुमारे 4 ते 7.5 लाख रुपये
* घराची किंमत 75 लाख रुपये असेल तर 6 ते 11 लाख रुपये
* घराची किंमत 1 कोटी रुपये असेल तर 8 ते 15 लाख रुपये
यापेक्षा अधिक खर्च करायचा असल्यास त्यासाठी स्वतंत्र बचत असणे आवश्यक आहे.
EMI आणि इंटिरिअरचा समतोल राखा
अनेक पगारदार घर खरेदीसाठी आधीच मोठा EMI भरत असतात. अशावेळी इंटिरिअरसाठी पुन्हा कर्ज घेतल्यास मासिक आर्थिक ताण वाढू शकतो.
आर्थिक नियोजनाचा एक महत्त्वाचा नियम असा सांगितला जातो की
* घराचा EMI हा मासिक उत्पन्नाच्या 30 ते 40 टक्क्यांपेक्षा जास्त नसावा.
* इतर सर्व कर्जे मिळून मासिक उत्पन्नाच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त हप्ता होऊ नये.
यामुळे बचत आणि इतर आर्थिक उद्दिष्टेही पूर्ण करता येतात.
आधी गरजेच्या गोष्टी, नंतर लक्झरी
घरात प्रवेश करताना सर्व गोष्टी एकाचवेळी करण्याची गरज नसते.
या गोष्टी आधी करून घ्याः
* मॉड्युलर किचन
* आवश्यक वॉर्डरोब
* बेसिक लाईटिंग
* पडदे
* आवश्यक फर्निचर
तर खालील गोष्टी पुढील काही महिन्यांत किंवा वर्षभरातही करता येतात.
* फॉल्स सिलिंग
* महागडे डेकोरेशन
* डिझायनर वॉल पॅनेल
* प्रीमियम फर्निचर
* ऑटोमेशन सिस्टम
इंटिरिअरसाठी बचत वापरणे अधिक फायदेशीर
इंटिरिअरसाठी वैयक्तिक कर्ज (Personal Loan) घेण्याऐवजी आधीच बचत करून खर्च करणे अधिक योग्य ठरते. कारण पर्सनल लोनवरील व्याजदर साधारणतः होम लोनपेक्षा जास्त असतात. त्यामुळे एकूण खर्चही वाढतो.
Emergency Fund विसरू नका
घर आणि इंटिरिअरवर सर्व बचत खर्च करणे टाळावे. किमान 6 महिन्यांच्या खर्चाइतका Emergency Fund वेगळा ठेवणे गरजेचे आहे. अचानक नोकरी जाणे, वैद्यकीय खर्च किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत हा निधी मोठा आधार ठरतो.
इंटिरिअर करताना या चुका टाळा
* ट्रेंड पाहून अनावश्यक खर्च करू नका.
* प्रत्येक खोलीत महागडे फर्निचर घेण्याचा हट्ट करू नका.
* क्रेडिट कार्डवर मोठ्या EMI करू नका.
* अनेक ठिकाणांचे कोटेशन न घेता निर्णय घेऊ नका.
* भविष्यातील आर्थिक उद्दिष्टांकडे दुर्लक्ष करू नका.
ADVERTISEMENT












