Mumbai News: मुंबईत पुरुषांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे लुबाडणाऱ्या महिलांच्या टोळीने जळगावच्या एका 46 वर्षीय व्यायसायिकाला आपल्या जाळ्यात अडकवल्याचं सांगितलं जात आहे. आरोपी महिलेनं संबंधित व्यावसायिकाला शारीरिक सुखाचं आमिष दाखवलं आणि त्याच्याकडून तब्बल 35,000 रुपये लुबाडल्याची माहिती समोर आली आहे. पीडित व्यक्ती मूळ जळगावची रहिवासी असून ती बऱ्याचदा बिझनेस ट्रिपसाठी मुंबईला येत होती. 23 सप्टेंबर रोजी व्यवसायाशी संबंधित कामासाठी पीडित तरुण मुंबईमध्ये आला होता. त्यावेळी, सीएसएमटी स्टेशनला पोहोचल्यानंतर एका अनोळखी महिलेसोबत त्याची ओळख झाली. त्यांच्यातील बोलणं वाढत गेलं आणि आरोपी महिलेनं त्याला 500 रुपयांमध्ये शारीरिक सुखाचं आमिष दाखवलं.
ADVERTISEMENT
त्या खोलीत घेऊन गेली...
व्यावसायिकाने महिलेचा प्रस्ताव स्विकारल्यानंतर ती त्याला टॅक्सीमधून गिरगावमधील भारत भवन हॉटेलजवळील एका इमारतीच्या वरच्या मजल्यावरील एका खोलीत घेऊन गेली. पीडित तरुण आत गेल्यानंतर त्याला खोलीत दुसरी महिला सुद्धा दिसली. काही वेळातंच, दोन्ही महिलांनी अचानक ओरडण्यास सुरूवात केली आणि त्यांनी पीडित तरुणावर आपले अश्लील व्हिडीओ बनवल्याचे आरोप केले.
तीन महिला खोलीत घुसल्या अन्...
दरम्यान, आणखी तीन महिला त्या खोलीत घुसल्या. त्यांनी पीडित तरुणाला धमकावून त्याच्याकडून तब्बल 22,000 रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले. इतकेच नव्हे तर बळजबरीने त्याच्या पाकिटातून 13,000 रुपये हिसकावून घेतले. या घटनेनंतर, पीडित व्यावसायिकाने 30 सप्टेंबर रोजी वीपी रोड पोलीस स्टेशनमध्ये यासंबंधी तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करत ऑनलाइन पैसे ट्रान्सफर झाल्याची पुष्टी केली आणि घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले.
हे ही वाचा: मुंबईच्या महिला 'डान्सर'वर बलात्कार! डान्स प्रॅक्टिसच्या नावाखाली खोलीत नेलं अन् दारू पाजून... पॉश एरिआत घडली घटना
पोलिसांचा तपास
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे, पोलिसांनी तिन्ही आरोपी महिलांना अटक केल्याचं सांगण्यात येत आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, महिलांच्या या टोळीने अशाच पद्धतीने आणखी काही पुरुषांना जाळ्यात अडकवलं असावं. आता आरोपी महिला कोणत्या मोठ्या वसूली टोळीशी जोडलेल्या आहेत का? याचा पोलीस शोध घेत आहेत.
हे ही वाचा: पत्नी करायची नको ते काम! पतीला भनक लागताच नातेवाईकांसोबत मिळून रचला मोठा कट अन् नंतर...
मजीता बेबी नूर (35), रूपा विश्वनाथ दास (47) आणि नसीमा जमाल शेख (38) अशी प्रकरणातील आरोपी महिलांची ओळख समोर आली आहे. तसेच, या प्रकरणात आणखी एक महिलेचा समावेश असून पोलीस तिचा शोध घेत असल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT
