Badlapur Accident: ठाण्यातील बदलापूर येथे शनिवारी (2 ऑगस्ट) सकाळी भीषण अपघात घडल्याचं वृत्त समोर आलं आहे. बदलापुरमध्ये मालाने भरलेला एक ट्रक अनियंत्रित झाला आणि त्याने भरधाव वेगाने जवळपास 3 ते 4 वाहनांना धडक दिली. या अपघातात एका महिलेसह दोघांना आपला जीव गमवावा लागला तसेच, 3 ते 4 लोक जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला आणि पोलीस सध्या त्याचा तपास करत आहेत. या भीषण अपघाताचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल होत आहे.
ADVERTISEMENT
नेमका कसा घडला अपघात?
या प्रकरणासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरच्या वलीवली गावाजवळून एरंजडच्या दिशेने मालाने भरलेला एक आयशर ट्रक भरधाव वेगाने येत होता. ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने कार आणि रिक्षासह 3 ते 4 वाहनांना ट्रकने धडक दिली. यामध्ये दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं आणि नंतर ट्रक झाडाला धडकला. या अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला. यामध्ये एक महिला आणि रिक्षा चालकाचा मृत्यू झाला असून 3 ते 4 जण गंभीर जखमी झाले.
हे ही वाचा: इंडिगो फ्लाइटमधील मारहाणीची घटना! रहस्यमय पद्धतीने गायब झाला हुसैन अहमद, कुटुंबियांनी सांगितलं की...
सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण घटना कैद
या घटनेनंतर जखमी झालेल्या व्यक्तींना वाचवण्यासाठी स्थानिक लोकांनी धाव घेतली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्यात अपघाताचे गांभीर्य दिसून येते. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दुसरीकडे, शिवथरघळहून ठाण्याला जाणाऱ्या एसटी बसचा चालक दिनकर डोंगरे (36) हा 50 प्रवाशांना घेऊन ठाण्याला जात होता. अपघातस्थळ एकेरी रस्ता असल्याचं माहीत असूनही त्याने बस वेगाने चालवली आणि मुंबईकडे येणाऱ्या आयशर टेम्पोला धडक दिली.
हे ही वाचा: मुंबई हादरली! घाटकोपरमध्ये तरुणीवर बलात्कार..मानसिक धक्का बसल्याने आरोपींची नावं विसरली, पण पोलिसांनी..
बसची टेम्पोला धडक
या अपघातात टेम्पोच्या केबिनचे मोठे नुकसान झालं असून केबिनमध्ये अडकलेला टेम्पो चालक दिनेश यादव गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली. त्याचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला आहे. टेम्पोमध्ये अडकलेल्या चालकाला स्थानिक नागरिकांनी लोखंडी साखळीच्या मदतीने टेम्पोचा आतील भाग मागे खेचून बाहेर काढले. ही दुर्दैवी घटना शनिवारी (2 ऑगस्ट) सकाळी 9 वाजता घडली.
ADVERTISEMENT
