Crime News: बिहारमधील मोतिहारा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका तरुणाने कामाहून घरी परतल्यानंतर त्याच्या पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं. त्यावेळी रागाच्या भरात आरोपी तरुणाने त्याच्या पत्नीवर कुऱ्हाडीने वार केला आणि पत्नीचा जागीच मृत्यू झाला. नेमकी घटना काय? सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT
काम संपवून घरी परतला अन्..
मोतिहारामधील पिपराकोठी पोलीस स्टेश परिसरात राहणारा सुबोध मांझी नावाचा तरुण कामानिमित्त गावाच्या बाहेर असायचा. काम संपल्यानंतर तो चार दिवसांपूर्वीच आपल्या सासरी गेला होता. संबंधित तरुणाची पत्नी मालती देवी तिच्या माहेरीच राहत होती. तसेच, दोघे पती-पत्नीमध्ये सतत मतभेद होत असल्याचं देखील सांगण्यात आलं. या जोडप्याला एक 5 वर्षांचा मुलगा असून मालती तिच्या मुलासोबत आपल्या माहेरीच राहत होती.
कुऱ्हाड उचलून पत्नीवर वार...
मिळालेल्या माहितीनुसार, सुबोध चार दिवसांपूर्वीच त्याच्या सासरी गेला होता. एके दिवशी, तो घराच्या बाहेर अंगणात झोपला असताना त्याने आपल्या पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं. पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत पाहिल्यानंतर सुबोधचा राग अनावर झाला आणि रागाच्या भरात त्याने बाजूला असलेली कुऱ्हाड उचलून मालतीवर हल्ला केला. या हल्ल्यात पीडित महिलेचा जागीच मृत्यू झाला.
हे ही वाचा: मुंबई हादरली! घाटकोपरमध्ये तरुणीवर बलात्कार..मानसिक धक्का बसल्याने आरोपींची नावं विसरली, पण पोलिसांनी..
पोलिसांचा तपास
यानंतर, आरोपी सुबोध घटनास्थळावरून पळून गेला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांची टीम घटनास्थळी पोहचली आणि तपास सुरू केला. त्यानंतर तातडीने कारवाई करत मुफस्सिल पोलीस स्टेशन परिसरातील बनकट येथून आरोपीला अटक केली. आरोपीची ओळख पटल्यानंतर हत्येत वापरलेली कुऱ्हाडही पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे.
हे ही वाचा: 3 पतींनी सोडलं..बाळ झाल्यावर प्रियकरानेही नातं संपवलं! मुंबईतील महिलेनं 6 महिन्यांच्या बाळाची केली हत्या
प्राथमिक तपासानुसार, आरोपीने पत्नीचे अनैतिक संबंध सुरू असल्याच्या संशयातून रागाच्या भरात पीडितेची हत्या केली. मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. आरोपीची तुरुंगात रवानगी करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
