Govt Job: वैद्यकीय क्षेत्रात मिळवा सरकारी नोकरी... विविध पदांसाठी भरती, काय आहे पात्रता?

केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद (CCRAS) कडून गट-अ, गट-ब आणि गट-क च्या विविध पदांवरील भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. (CCRAS-2025) परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

वैद्यकीय क्षेत्रात मिळवा सरकारी नोकरी...

वैद्यकीय क्षेत्रात मिळवा सरकारी नोकरी...

मुंबई तक

• 12:43 PM • 02 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

CCRAS कडून विविध वैज्ञानिक पदांसाठी भरती

point

काय आहे पात्रता?

Govt Job: वैज्ञानिक क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद (CCRAS) कडून गट-अ, गट-ब आणि गट-क च्या विविध पदांवरील भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. (CCRAS-2025) परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. CCRAS ने 1 ऑगस्टपासून अर्ज करण्यासाठी विंडो सक्रिय केली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट ccras.nic.in ला भेट देऊन या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

हे वाचलं का?

उमेदवारांकडून 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील. तसेच, या भरतीच्या माध्यमातून गट-अ, गट-ब आणि गट-क मधील एकूण 394 पात्र उमेदवारांची नियुक्ती केली जाईल.

वयोमर्यादा

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी पदानुसार वेगवेगळी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. भरतीच्या अधिकृत नोटिफिकेशन मध्ये दिलेल्या माहितीनुसार, या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी  27, 28, 30, 35 आणि 40 वर्षे कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. 

हे ही वाचा: सासूने दिलं नशेचं औषध अन् बेशुद्ध झाल्यानंतर दीरांकडून घाणेरडं कृत्य... महिलेनं सासरच्यांबद्दल सगळंच सांगितलं

शैक्षणिक पात्रता

या भरतीमधील ग्रुप A पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे पॅथोलॉजी किंवा आयुर्वेद मध्ये पदव्युत्तरची डिग्री असणं आवश्यक आहे. तसेच, ग्रुप B पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे M फार्म , बीएसएसी नर्सिंग , पदवीधर आणि पदव्युत्तरची डिग्री  याशिवाय, ग्रुप C पदांसाठी अर्ज   करणाऱ्या उमेदवारांकडे 12 वी उत्तीर्ण, फार्मसीमध्ये डिप्लोमा, एम फार्मा, एमएससी इ. डिग्री असणं अनिवार्य आहे. 

अर्ज करण्यासाठी शुल्क

उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पदानुसार शुल्क आकारण्यात येईल. 

गट अ- जनरल (Open) आणि ओबीसी (OBC) प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रुपये
गट ब- जनरल (Open) आणि ओबीसी (OBC) प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500 रुपये
गट क-  जनरल (Open) आणि ओबीसी (OBC) प्रवर्गातील उमेदवारांसाठी 200 रुपये

हे ही वाचा: "सध्या, मुली नग्न होऊन पैसे कमवतात" साध्वी ऋतंभरांनी केलं 'ते' विधान अन् पुन्हा वाद...

निवड प्रक्रिया

गट-अ पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे नियुक्ती केली जाईल. यासाठी 70 गुणांसाठी लेखी परीक्षा आणि 30 गुणांसाठी मुलाखत घेतली जाईल. तसेच, गट-ब आणि गट-क पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड करण्यासाठी 100 गुणांची लेखी परीक्षा आयोजित केली जाईल. 

    follow whatsapp