इंडिगो फ्लाइटमधील मारहाणीची घटना! रहस्यमय पद्धतीने गायब झाला हुसैन अहमद, कुटुंबियांनी सांगितलं की...

मुंबईहून कोलकाताला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइटमधील एका प्रवाशाला मारहाण झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेत पीडित तरुणाबद्दल एक नवी अपडेट समोर आली आहे.

रहस्यमय पद्धतीने गायब झाला हुसैन अहमद, कुटुंबियांनी सांगितलं की...

रहस्यमय पद्धतीने गायब झाला हुसैन अहमद, कुटुंबियांनी सांगितलं की...

मुंबई तक

02 Aug 2025 (अपडेटेड: 02 Aug 2025, 05:13 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

इंडिगो फ्लाइटमध्ये प्रवाशाने पीडित तरुणाच्या कानशिलात लगावली

point

या प्रकरणातील मोठी अपडेट

point

पीडित तरुण एअरपोर्टवरून अचानक गायब...

Viral Video: इंडिगो फ्लाइटमधील मारहाणीच्या घटनेतील पीडित तरुणाच्या कुटुंबियांनी चकित करणारा दावा केल्याचं समोर आलं आहे. मुंबईहून कोलकाताला जाणाऱ्या फ्लाइटमधील एका प्रवाशाला मारहाण झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेत पीडित तरुणाबद्दल एक नवी अपडेट समोर आली आहे. व्हिडीओमध्ये मारहाण होत असलेला व्यक्ती एअरपोर्टवरून रहस्यमय पद्धतीने गायब झाल्याचं सांगण्यात येत आहे.

हे वाचलं का?

प्रवाशाने पीडित तरुणाच्या कानशिलात...

पीडितेचे नाव हुसेन अहमद असून तो आसाममधील कछार जिल्ह्यातील कटीगोरा येथील रहिवासी आहे. हुसैन अहमद कामानिमित्त मुंबईत होता, अशी माहिती आहे. प्रवासादरम्यान,  विमान हवेत होते, त्याला काही त्रास होऊ लागला. त्यावेळी फ्लाइटमध्ये उपस्थित असलेले केबिन क्रू हुसेन अहमदला समजावून सांगत होते. मात्र त्यावेळी अचानक एका प्रवाशाने पीडित हुसैनच्या कानाखाली मारली.

अचानक एअरपोर्टवरून बेपत्ता 

या घटनेनंतर हुसैन अहमद कोलकाता एअरपोर्टवरून बेपत्ता असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याच्या कुटुंबियांच्या मते, हुसैन मुंबईहून कोलकाताला आला होता आणि कोलकाताहून शिलाँगला जाणार होता. अशातच हुसैनचे कुटुंबिय त्याला घेण्यासाठी विमानतळावर पोहोचले होते.

हे ही वाचा: पती काम करुन घरी परतला अन् पत्नी दुसऱ्याच पुरुषासोबत... संतापलेल्या पतीने शेवटी...

कुटुंबियांनी काय सांगितलं? 

मात्र, एअरपोर्टवर पोहचल्यानंतर त्यांना हुसैन सापडला नाही. हुसैन अचानक बेपत्ता झाल्यामुळे त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. हुसैनच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, मुंबईहून कोलकाता पोहोचल्यानंतर ते हुसैनशी फोनवर बोलले. पण त्यानंतर हुसैनने फोन उचलणं बंद केलं. 

त्यानंतर कुटुंबियांनी इंडिगो अधिकाऱ्यांशी संपर्क साधला पण त्यांना तिथून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचा त्यांनी दावा केला. आता कुटुंबियांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याकडे या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

हे ही वाचा: "सध्या, मुली नग्न होऊन पैसे कमवतात" साध्वी ऋतंभरांनी केलं 'ते' विधान अन् पुन्हा वाद...

खरंतर, इंडिगोची फ्लाइट मुंबईहून कोलकाताला जात होती. यादरम्यान एका प्रवाशाला पॅनिक अटॅक आला आणि तो घाबरू लागला. दरम्यान, एअर होस्टेस त्याची समजावून सांगत असताना दुसऱ्या प्रवाशाने अचानक त्याच्या कानशिलात लगावली. दरम्यान, त्या प्रवाशाने त्याला मारणाऱ्याला विचारले, 'तू मला का मारलंस?' त्यावेळी तो म्हणाला की त्याच्यामुळे सगळं घडत आहे. त्याच वेळी दुसरा प्रवासी म्हणाला, "त्याने असा हात उचलायला नको होतं."

    follow whatsapp