Mumbai News: मुंबईतील गिरगाव येथे एक धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका खाजगी कंपनीत कार्यरत असलेल्या 39 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. संबंधित घटना ही सोमवारी (17 नोव्हेंबर) घडल्याची माहिती आहे. घटनेतील आरोपी पीडित तरुणाचा सहकारी असून त्याने बेदम मारहाण करत तरुणाचा निर्घृण खून केला.
ADVERTISEMENT
कंपनीतील सहकाऱ्यानेच केली निर्घृण हत्या
या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी एका न्यूज एजन्सीला माहिती दिली. यासंबंधी पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील गिरगाव येथे असलेल्या सेंटेक कोटेड स्टील्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये सोमवारी रात्री 1 ते 1:30 वाजताच्या सुमारास ही भयानक घटना घडली. प्रकरणातील पीडित तरुण हा गुजरातचा रहिवासी असून त्याच्या कंपनीतील सहकाऱ्यानेच त्याची निर्घृण हत्या केल्याचं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा: मुंबई: शाळेत सोडताना व्हॅन चालकाचा विद्यार्थीनींवर विनयभंग! पीडितेने आईला सगळंच सांगितलं अन्...
लाकडी स्टूल आणि अग्निशमन यंत्राने हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेतील मृताची ओळख गुजरातच्या बनासकांठा येथील रहिवासी रमेश हाजी चौधरी अशी समोर आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्याच परिसरात राहणाऱ्या आणि एकाच कंपनीत कार्यरत असणाऱ्या आरोपी सूरज संजय मंडल (22) याने पीडित रमेशला बेदम मारहाण केली. आरोपी सूरजने पीडित तरुणावर लाकडी स्टूल आणि अग्निशमन यंत्राने हल्ला केला. यामुळे रमेशचा जागीच मृत्यू झाला.
हे ही वाचा: बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक.. उद्धव ठाकरेंची नियुक्ती, 'ही' आहे पडद्यामागची डावपेच आणि कुरघोडींची रंजक Inside स्टोरी
पोलिसांनी दिलं आश्वासन
आपल्याच कंपनीतील सहकाऱ्याने केलेल्या या जीवघेण्या हल्ल्यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच, आरोपीच्या अटकेसाठी आता पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर ताब्यात घेतलं जाणार असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
ADVERTISEMENT











