Mumbai Crime: व्हिडीओ कॉलवर मोठ्या आवाजात बोलण्यावरून दोघांमध्ये मोठा वाद झाला आणि या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका 39 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करून तिची हत्या करण्यात आली. माणूसकीला काळीमा फासणारी ही खळबळजनक घटना मुंबईतील मस्जिद बंदर परिसरात घडली. याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी 19 वर्षीय आरोपीला इब्राहिम कालू याला अटक केली असून तो आता पोलीस कोठडीत असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
नेमकं काय घडलं?
संबंधित घटना सोमवारी दुपारी जवळपास 1:00 ते 1:30 वाजताच्या सुमारास मस्जिद बंदर परिसरातील क्लाइव्ह रोडवरील दाना बंदर येथे घडली. 39 वर्षीय विपुल कर्मकार अशी मृत तरुणाची ओळख समोर आल्याची माहिती आहे. तपासात समोर आलं की, पीडित विपुल त्याच्या मोबाईल फोनवरून एका मुलीसोबत व्हिडीओ कॉलवर मोठमोठ्या आवाजात बोलत होता. त्याच्या शेजारी उभ्या असलेला आरोपी इब्राहिमने विपुलला हळू आवाजात व्हिडीओ कॉलवर बोलण्यास सांगितलं. या कारणावरून त्या दोघांमध्ये मोठा वाद झाला आणि काही क्षणांतच या वादाने हिंसक वळण घेतलं.
हे ही वाचा: मंगळ ग्रहाचा कुंभ राशीत प्रवेश! 'या' राशींच्या लोकांच्या आर्थिक अडचणी वाढणार... कोणते उपाय करावेत?
आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल...
एफआयआरनुसार, रागाच्या भरात इब्राहिमने विपुलला लाकडी काठीने मारहाण केली. त्यानंतर, आरोपीने तरुणाला सिमेंटच्या रस्त्यावर आपटलं. या मारहाणीत विपुल अतिशय गंभीररित्या जखमी झाला. पीडित तरुणाला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून आरोपी तिथून पळून गेला आणि स्थानिक लोकांनी जखमी विपुलला सर जे.जे रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, त्यांनी आरोपी इब्राहिमविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्याला बुधवारी संध्याकाळच्या सुमारास अटक करण्यात आली. त्यानंतर, स्थानिक न्यायालयाने आरोपीला पोलिस कोठडी सुनावल्याचं सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा: बँकिंग क्षेत्रातील 23 वर्षांच्या नोकरीनंतर अमृता फडणवीस यांचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची पोस्ट तुफान व्हायरल
याप्रकरणी मुंबईतील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंध्रा म्हणाले की, अशा घटना सामान्यतः अचानक राग येणे, भावनिक नियंत्रण कमी असणे आणि मानसिक ताण यामुळे घडतात. आजच्या शहरी जीवनात, आर्थिक ताण, व्यसन, झोपेचा अभाव आणि वैयक्तिक निराशा या सर्व गोष्टींमुळे व्यक्तीची सहनशीलता कमी होऊ शकते. परिणामी, या घटनेप्रमाणेच, किरकोळ समस्या देखील हिंसाचारात बदलू शकतात.
ADVERTISEMENT











