मुंबई : दीरासमोर विवाहितेने गळफास घेतला, बॉडी नग्न अवस्थेत सापडली; चॅटींगमधून अनैतिक संबंध समोर

Mumbai Crime : मुलीने आईचा मोबाईल तपासला असता काही खासगी चॅट्स आढळून आल्या. या संदेशांमधून महिलेचे दिरासोबत अनैतिक संबंध असल्याचे संकेत मिळाले. या पार्श्वभूमीवर आत्महत्येमागील कारणांबाबत संशय अधिक गडद झाला

mUMBAI cRIME

mUMBAI cRIME

मुंबई तक

19 Dec 2025 (अपडेटेड: 19 Dec 2025, 12:32 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई : दीरासमोर विवाहितेने गळफास घेतला

point

बॉडी नग्न अवस्थेत सापडली

point

चॅटींगमधून अनैतिक संबंध समोर

Mumbai Crime : मुंबईतील वडाळा परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरातच असलेल्या दिराच्या उपस्थितीत एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला असून, मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळल्याने संशय अधिक बळावला आहे. या प्रकरणात महिलेच्या मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांनी दिराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मोबाईल चॅटमधून महिलेचे दिरासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचे संकेत मिळाल्याने प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

हे वाचलं का?

विवाहितेचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळून आला 

पोलिसांच्या माहितीनुसार, प्रतीक्षानगर परिसरात एक कुटुंब वास्तव्यास होते. पती, पत्नी आणि त्यांची 25 वर्षांची मुलगी असे हे कुटुंब असून, काही महिन्यांपासून पतीचा आत्येभाऊ (दीर) त्यांच्याच घरी राहत होता. घटनेच्या दिवशी पती आणि मुलगी दोघेही सकाळी कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्या वेळी घरात महिला आणि दीर एवढेच होते.

सायंकाळी मुलगी घरी परतल्यानंतर तिला घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे आढळले. तिने वारंवार दार ठोठावले; मात्र आतून कोणतीही हालचाल झाली नाही. शेजाऱ्यांनीही मदतीसाठी दार वाजवले, तरी प्रतिसाद मिळाला नाही. यावेळी दिराने दरवाजा बाहेरून ढकलून उघडण्याचा सल्ला देत वेळकाढूपणा केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. बराच वेळ गेल्यानंतरच दरवाजा उघडण्यात आला.

हेही वाचा : 'माझा मुलगा 12 वर्षांपासून कोमात, त्याला मरण द्या', पालकांची न्यायालयात मागणी; आता न्यायमूर्ती प्रत्यक्ष जाणार अन्...

दरवाजा उघडताच आतले दृश्य अंगावर शहारे आणणारे होते. महिलेचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आला आणि ती विवस्त्र असल्याचे लक्षात आले. मुलीने आईला वाचवण्याचा प्रयत्न न करता केवळ पाहत राहिल्याबाबत दिराला जाब विचारला; मात्र त्याने कोणतेही ठोस उत्तर दिले नसल्याचे तक्रारीत नमूद आहे.

यानंतर मुलीने आईचा मोबाईल तपासला असता काही खासगी चॅट्स आढळून आल्या. या संदेशांमधून महिलेचे दिरासोबत अनैतिक संबंध असल्याचे संकेत मिळाले. या पार्श्वभूमीवर आत्महत्येमागील कारणांबाबत संशय अधिक गडद झाला. मानसिक तणाव, कौटुंबिक वाद किंवा दबावातून हा प्रकार घडला असावा, अशा शक्यताही तपासात समोर येत आहेत.

घटनेची माहिती मिळताच वडाळा टीटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. तसेच, मोबाईल चॅट्स, घरातील परिस्थिती आणि शेजाऱ्यांचे जबाब नोंदवून पोलिस पुढील तपास करत आहेत.

या प्रकरणात दिराने आत्महत्येला प्रवृत्त केले का, अथवा गुन्हेगारी दुर्लक्ष झाले का, याचा तपास सुरू आहे. सत्य परिस्थिती समोर येईपर्यंत सर्व शक्यता खुल्या ठेवून चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

इतर महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर: मित्राने बोलवल्यावर लॉजवर गेली, पण दारूच्या नशेत भलत्याच रूममध्ये शिरली अन् विवाहितेवर लैंगिक अत्याचार!

    follow whatsapp