Mumbai Crime: ठाणे आणि मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवर प्रवाशांचे मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या एका टोळीतील दोघांना अटक केली असल्याची बातमी समोर आली आहे. संबंधित प्रकरणाबाबत पोलीस अधिकाऱ्याने एका न्यूज एजन्सीला माहिती दिली. नाशिकच्या या टोळीतील सदस्यांनी चोरी केलेले सुमारे 10 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
ADVERTISEMENT
अनोळखी लोकांपासून बोलून विश्वास संपादन...
वरिष्ठ पोलीस अधिकारी विजय खेडकर यांनी या प्रकरणासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रेल्वे स्टेशनवरील अनोळखी लोकांसोबत बोलण्याचा प्रयत्न करायचे. त्यानंतर, ते मैत्रीपूर्वक संवाद साधून लोकांचा विश्वास संपादन करायचे आणि शेवटी निघण्यापूर्वी हातचलाखीने किंवा बळजबरीने लोकांचे सोन्याचे दागिने हिसकावून पळून जायचे. अद्याप या टोळीतील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून चोरी केलेले मौल्यवान दागिने जप्त करण्यात आल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
ज्येष्ठ नागरिकासोबत देखील असंच घडलं
दोन आठवड्यांपूर्वीच ठाण्यातील एक ज्येष्ठ नागरिक आपल्या जावयाला भेटण्यासाठी कल्याण स्टेशनवर पोहोचले होते. तिथे प्लॅटफॉर्मवर वाट बघत उभे असताना अचानक दोन लोक त्यांच्याजवळ आले. दरम्यान, दोघांनीही त्या वृद्ध व्यक्तीसोबत संवाद साधला आणि त्यांचा विश्वास संपादन केला. अखेर, आरोपींनी संबंधित व्यक्तीच्या बोटातून सोन्याची अंगठी हिसकावून ते पळून गेले.
हे ही वाचा: पतीला सोडून दीरासोबतच उरकलं लग्न! संतापलेल्या तरुणाने सासरी जाऊन घातला धिंगाणा अन् सासूला...
पोलीस अधिकाऱ्यांनी दिली माहिती
कल्याण जीआरपी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या या तक्रारीनंतर, मुंबईतील कुर्ला रेल्वे स्टेशनवर सुद्धा अशाच पद्धतीचं चोरीचं प्रकरण समोर आलं. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस पथकांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजचा तपास केला आणि दोन्ही ठिकाणच्या चोरीच्या प्रकरणात एकच आरोपींचा समावेश असल्याची पुष्टी करण्यात आली.
हे ही वाचा: लग्नानंतर 45 दिवसात संसार मोडला, पोटगीसाठी 45 लाख मोजले; पुण्यातील महागडा घटस्फोट चर्चेत
अफजल अहमद मदारी (23) आणि मुश्तान नजमुद्दीन मदारी (21) अशी अटक झालेल्या आरोपींची ओळख समोर आली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींचा नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातून शोध घेतला आणि त्यांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
