Mumbai Crime : महिला, तरुणी या देशातील स्त्री खरोखरच सुरक्षित आहे का? असे अनेकांनी प्रश्न विचारले आहेत. महिला, तरुणी समाजातच नाही,तर आता आपल्याच कुटुंबात सुरक्षित आहे का? असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. लोकमत या प्रिंट माध्यमाने अशाच एका हैवानी कृत्याचा पर्दाफाश केला आहे. वडील, भावांसह चौघांनी तब्बल 11 महिने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ऐकून धक्का बसला असेलच. संबंधित नराधमांना अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Mumbai Weather: जरा जपून..मुंबईला जाताय? शहरातील 'या' भागात मुसळधार पाऊस घालणार धुमाकूळ
एकूण घटनाक्रम
ही घटना मुंबईतील मुलुंड येथे घडली आहे. पीडित तरुणी ही अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. दोन भाऊ, वडील आणि एका ओळखीच्या व्यक्तीने घरातील लक्ष्मीवर 11 महिने लैंगिक शोषण केलं आहे. संबंधित प्रकरणात नराधमांवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
मुलुंड परिसरातील कुटुंबातच राहणारी अल्पवयीन लेक लाडकी स्वत:च्याच कुटुंबात असुरक्षित राहिली आहे. कुटुंबासह तिच्या कुटुंबियांनी अवघ्या 14 वर्षीय पोटच्या लेकीवर लैंगिक अत्याचार केले आहेत. तिच्या (वय 16) आणि (वय 18) वर्षे दोन भावांसह 57 वर्षीय पुरूषाने जानेवारी ते नोव्हेंबर 2024 च्या कालावधीत पीडितेवर लैंगिक अत्याचार केले आहेत. संबंधित प्रकरणात आता तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, यातील अल्पवयीन आरोपीला बालसुधागृहात पाठवले आहे. यावेळी पीडित भयभीत होऊन तिनं घरातील अत्याचाराला वाचा फोडली नाही.
हेही वाचा : ग्रहण दोष योगामुळे 'या' राशीतील लोकांना साडेसातीचा फेरा, कारण आलं समोर, तुमची राशी काय सांगते?
तपासादरम्यान, पीडित मुलीलाही बालसुधागृहात ठेवण्यात आले आहे. तिने बालसुधागृहातील अधीक्षकांना वडील, दोन भाऊ आणि ओळखीच्या व्यक्तीकडून आत्याचार केल्याची माहिती उघडकीस आली आहे. तेव्हा अधीक्षकांनाही हे ऐकून धक्का बसला. अधीक्षकांनी याची गांभीर्याने दखल घेत चाईल्ड वेल्फेअर कमिटी सीडब्ल्यूसी यांना पीडित मुलीचा जबाब नोंदवण्यास सांगितला.
ADVERTISEMENT
