Mumbai Crime : मुंबईतील दिंडोशीत एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका प्रेयसीने नवऱ्याचं सोनं नाणं चोरून प्रियकराला दिले. त्यानंतर तिने पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित घटनेची माहिती पोलिसांना दिली असता, चोरीची तक्रार दाखल केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना दिंडोशी पोलिसांनी मोठा खुलासा केला आणि दागिने चोरी केल्याप्रकरणी पत्नीला अटक केली आणि तिच्याकडून सुमारे साडे दहा तोळे सोने जप्त केले. या घटनेनं पोलिसही हादरून गेले आहेत. हे प्रकरण गोरेगाव पूर्वेतील बीएमसी कॉलनीतील आहे. आरोपी पत्नीचं नाव उर्मिला हळदिवे असे आहे. तर आरोपी पतीचं नाव रमेश हळदिवे असे आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बाईचा नाद लय बेकार! नर्तिकेच्या नादी लागला उपसरपंच, जमीन जुमला अन् सोनं नाणं सारंच लुटलं, अखेर स्वत:च्याच डोक्यावर बंदुक...
नेमकं काय घडलं?
पत्नी उर्मिला रमेश हळदिवेनं तिच्या पतीला अचानकपणे दागिने कपाटातून गायब झाल्याचं सांगितलं होतं. तिने तिच्या नवऱ्यावर दागिने गायब झाल्याचा आरोप केला होता. रमेशनं तिला सांगितलं की, मला दागिन्यांबाबत कसलीही माहिती नव्हती. त्यानंतर रमेश आणि त्याच्या पत्नीने दिंडोशी ठाण्यात घरातून दागिन्यांची चोरी झाल्याची तक्रार दाखल केली.
संबंधित प्रकरणात दिंडोशी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अजित देसाई यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. घरात घुसून झालेली चोरी नसून घरातील व्यक्तीनंच ही चोरी केली आहे. आरोपीनं पोलिसांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न केला होता. या प्रकरणाचा पोलिसांना संशयही आला होता. दिंडोशी पोलीस अधिकारी अजित देसाई यांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर चोरीबाबत कसलाही तपास लागू दिला नाही.
घरातील दागिने चोरीला कसे गेले?
काही दिवसानंतर पोलिसांना संशय आला की, घरात कुणीच चोरी केली नाही,तर घरातील दागिने चोरीला कसे गेले? असा प्रश्न उपस्थित होतो. पोलिसांनी सर्व कुटुंबातील सदस्यांचे कॉल रेकॉर्ड चेक केले आणि मोबाइल फोन लोकेशनची तपासणी करण्यास सुरुवात केली असता, हे धक्कादायक प्रकरण समोर आलं.
हे ही वाचा : बीड हुंडाबळी! सासरच्यांकडून तरुणीला पाच लाखांची मागणी, नंतर मारहाण करत नवरा म्हणाला तू आवडत नाही अन् विहिरीत...
आईचेच मुलीच्या बॉयफ्रेंडशी प्रेम
पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी केली असता, पत्नी उर्मिलाचे आपल्याच मुलीच्या 18 वर्षीय बॉयफ्रेंडशी प्रेमसंबंध होते. तिने त्याला अनेकदा काही दागिनेही दिले होते. तिने अनेकदा पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. तिला आपल्या बॉयफ्रेंडला करोडपती बनवायचे होते जेणेकरून तिला या पैशातून चांगलं आयुष्य जगता आलं असतं, असा तिनं नियोजन करत दागिन्यांची चोरी केली होती. त्यामुळे तिने ते दागिने विकले आणि सुमारे 10 लाख रुपये तिच्या बॉयफ्रेंडच्या खात्यात पाठवले होते.
त्यानंतर पोलिसांनी उर्मिलाची कसून चौकशी केली. तेव्हा तिला पोलिसांनी अनेक प्रश्न विचारले असता, दागिन्यांची चोरी केल्याप्रकरणी उर्मिलाने कबुलीनामा दिला. तेव्हाच उर्मिलाच्या मुलीचा बॉयफ्रेंडही त्या ठिकाणी होता. उर्मिलाने जिथून सोन्यांची चोरी केली होती ते पोलिसांनी जप्त करत ताब्यात घेतले.
ADVERTISEMENT
