मुंबई: ट्रेडिंगच्या नावाखाली तब्बल 35 कोटींची फसवणूक! 72 वर्षीय वृद्धाने केली तक्रार अन् पुढे...

एका 72 वर्षीय व्यक्तीची तब्बल 35 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची बातमी समोर आली आहे. ट्रेडिंगच्या नावाखाली ही मोठी फसवणूक झाल्याचा आरोप आहे.

ट्रेडिंगच्या नावाखाली कोटी रुपयांची फसवणूक!

ट्रेडिंगच्या नावाखाली कोटी रुपयांची फसवणूक!

मुंबई तक

• 08:00 AM • 01 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

ट्रेडिंगच्या नावाखाली तब्बल 35 कोटींची फसवणूक!

point

72 वर्षीय वृद्धाने सायबर फ्रॉडबाबत केली तक्रार अन् पुढे...

Mumbai Crime: मुंबईतून सायबर फ्रॉडचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. येथे एका 72 वर्षीय भरत हरकचंद शाह नावाच्या वृद्धाची गेल्या चार वर्षांत तब्बल 35 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची बातमी समोर आली आहे. पीडित वृद्ध माटुंगा (पश्चिम) येथे राहत असून ग्लोब कॅपिटल मार्केट लिमिटेडने त्यांच्या पत्नीच्या बँक खात्याचा वापर करून अनधिकृत ट्रेडिंग केलं आणि त्यांची आपली वारंवार दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. 2020 मध्ये शाह यांनी त्यांच्या पत्नीसह संबंधित फर्ममध्ये डीमॅट आणि ट्रेडिंग खातं उघडल्यानंतर या प्रकरणाला सुरूवात झाली. 

हे वाचलं का?

अशाप्रकारे झाली फसवणूक... 

शाह आणि त्यांची पत्नी कर्करोगाच्या रुग्णांसाठी कमी भाड्या तत्त्वावर गेस्ट हाऊस चालवतात. 1984 मध्ये त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर शाह यांना स्टॉक पोर्टफोलिओ वारसा हक्काने मिळाला. शेअर मार्केटची त्यांना तितकी समज नसल्याने, पोर्टफोलिओ वर्षानुवर्षे ट्रान्झेक्शन म्हणजेच व्यवहार न करताच राहिला. 2020 मध्ये, एका मित्राच्या सल्ल्यानुसार, शाह यांनी ग्लोब कॅपिटलमध्ये त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या नावे डीमॅट आणि ट्रेडिंग खातं उघडलं. त्यांनी वारसा हक्काने मिळालेले सर्व शेअर्स कंपनीला ट्रान्सफर केले. सुरुवातीला, कंपनीचे प्रतिनिधी त्यांच्याशी नियमितपणे संपर्क साधायचे आणि त्यांना कोणत्याही अतिरिक्त गुंतवणुकीची आवश्यकता नाही तसेच शेअर्सचा तारण म्हणून वापर करून व्यापार करणे सुरक्षित असल्याची खात्री देत रहायचे. कंपनीने शाह यांना सांगितले की, त्यांच्यासाठी पर्सनल गाइड नियुक्त केले जातील. याच बहाण्याने, अक्षय बारिया आणि करण सिरोया या कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बँक खात्यांवर पूर्ण नियंत्रण मिळवलं आणि त्यांचा पोर्टफोलिओ सांभाळण्याचं नाटक केलं. 

ट्रेडिंग ऑर्डर देण्यासाठी फोन करायचे 

एफआयआरनुसार, सुरुवातीला हे कर्मचारी शहा यांना दररोज ट्रेडिंग ऑर्डर देण्यासाठी फोन करायचे. काही काळानंतर, ते शहा यांच्या घरी भेटण्यासाठी येऊ लागले, त्यांनी त्यांच्या लॅपटॉपवरून ईमेल पाठवण्यास सुरुवात केली आणि त्यांना हवी असलेली माहिती ते देऊ लागले. त्यानंतर, शाह कर्मचाऱ्यांच्या सांगण्यावरून सतत ओटीपी एंटर करायचे, मेसेज उघडत होते आणि कोणताच संशय न घेता सूचनांचं पालन करायचे. कालांतराने, कर्मचाऱ्यांनी पूर्ण नियंत्रण पीडित वृद्धाच्या खात्यावर पूर्ण नियंत्रण मिळवलं. मार्च 2020 ते जून 2024 पर्यंत, शाह यांना दरवर्षी नफा दर्शवणारे स्टेटमेंट ईमेल केले जात होते, ज्यामुळे त्यांना कोणत्याही फसवणुकीचा संशय येत नव्हता.

हे ही वाचा: मुंबईची खबर: मुंबईत आवडीचा फ्लॅट खरेदी करण्याची संधी! 4,508 घरांसाठी सिडकोची लॉटरी, सरकारकडून सब्सिडीसुद्धा...

नकळत कोट्यवधी रुपयांचे शेअर्स विकले गेले अन्... 

जुलै 2024 मध्ये, शाह यांना अचानक कंपनीच्या रिस्क मॅनेजमेंट विभागाकडून एक फोन आला, ज्यामध्ये त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या खात्यात 35 कोटी रुपयांचं डेबिट बॅलन्स असल्याचं सांगण्यात आलं. ताबडतोब पैसे द्या, नाहीतर तुमचे शेअर्स विकले जातील, असं त्या फोन करणाऱ्या व्यक्तीने वृद्धाला सांगितलं. कंपनीत पोहोचल्यावर, शाह यांना त्यांच्या नावावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत ट्रेडिंग झाल्याची माहिती देण्यात आली. त्यांच्या नकळत कोट्यवधी रुपयांचे शेअर्स विकले गेले आणि सतत होणाऱ्या सर्क्युलर ट्रेड्समुळे मोठे नुकसान झालं. त्यांची उर्वरित संपत्ती वाचवण्यासाठी, शाह यांना त्यांचे उर्वरित शेअर्स विकून पूर्ण 35 कोटी परत करावे लागले. नंतर, त्यांनी उर्वरित सर्व शेअर्स दुसऱ्या कंपनीला ट्रान्सफर केले. जेव्हा शाह यांनी कंपनीच्या वेबसाइटवरून प्रत्यक्ष ट्रेडिंग स्टेटमेंट डाउनलोड केलं आणि ईमेलद्वारे मिळालेल्या नफ्याच्या स्टेटमेंटशी त्यांची तुलना केली तेव्हा त्यांना एक वेगळीच तफावत आढळली. त्यांना NSE ने अनेक नोटिस पाठवल्या होत्या, परंतु त्यांना कधीही याबाबत माहिती देण्यात आली नसल्याचं आढळून आलं. 

हे ही वाचा: बऱ्याच काळापासून प्रेमसंबंध, पण घरच्यांनी दुसरीकडेच ठरवलं लग्न! अखेर, प्रेमी युगुलाचा टोकाचा निर्णय अन्...

तक्रारीत पीडित वृद्धाने काय सांगितलं? 

तक्रार करताना शाह म्हणाले की, "चार वर्षांपासून कंपनीने आम्हाला खोटे चित्र दाखवलं पण खरं तर नुकसानच वाढत राहिलं. शाह यांनी या प्रकरणाला संघटित आर्थिक फसवणूक असल्याचं म्हटलं. त्यांनी वनराई पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केल्याची माहिती आहे. तक्रारीच्या आधारे, भारतीय दंड संहितेच्या कलम 409 (गुन्हेगारी विश्वासघात) आणि 420 (फसवणूक) आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पुढील तपासासाठी तो मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) सोपवण्यात आला असल्याचं सांगितलं जात आहे. 

    follow whatsapp