मुंबई: डिलीव्हरी बॉय महिलेच्या घरी गेला आणि पाहता क्षणीच प्रेमात पडला, नंतर रिफंडच्या बहाण्याने मॅसेज अन्...

मुंबईतील एका डिलीव्हरी बॉयचा संतापजनक कारनामा उघडकीस आला आहे. त्याने भलतंच तरुणीचा नंबर घेतला आणि तिला व्हॉट्सअॅपवर अश्लील मॅसेजेस पाठवण्यास सुरुवात केली.

रिफंडच्या बहाण्याने अश्लील मॅसेज अन्...

रिफंडच्या बहाण्याने अश्लील मॅसेज अन्...

मुंबई तक

• 12:02 PM • 22 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

डिलीव्हरी बॉय महिलेच्या घरी गेला आणि पाहता क्षणीच प्रेमात...

point

नंतर रिफंडच्या बहाण्याने अश्लील मॅसेज अन्...

Mumbai Crime: मुंबईतील एका डिलीव्हरी बॉयचा संतापजनक कारनामा उघडकीस आला आहे. या आरोपीवर पोलिसात एफआयआर सुद्धा दाखल करण्यात आला. मुंबईच्या भायखळा परिसरात एक डिलीव्हरी बॉय ग्रॉसरीचं सामान घेऊन ग्राहकाच्या घरी गेला होता. त्यावेळी, दरवाजात महिलेला पाहून तिच्यावर तो भाळला. त्यानंतर, त्याने भलतंच तरुणीचा नंबर घेतला आणि तिला व्हॉट्सअॅपवर अश्लील मॅसेजेस पाठवण्यास सुरुवात केली. अखेर, पीडितेने वैतागून डिलीव्हरी बॉयविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. 

हे वाचलं का?

मुंबईतील भायखळा परिसरात एका अज्ञात डिलिव्हरी बॉयने महिलेला वारंवार अश्लील मेसेज पाठवून मानसिक त्रास दिल्याची एक गंभीर प्रकरण समोर आलं आहे. आरोपीविरुद्ध महिलेने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. 

रिफंडच्या बहाण्याने मोबाईल नंबर घेतला अन्....

पोलिसांच्या माहितीनुसार, 23 सप्टेंबर रोजी परिनाज नावाच्या महिलेने ऑनलाइन अॅपद्वारे किराणा सामान ऑर्डर केलं. दुपारी 4 वाजताच्या सुमारास, एक डिलीव्हरी बॉय मागवलेल्या वस्तू तिच्या घरी घेऊन आला. मात्र, ऑर्डर केलेल्या काही वस्तू उपलब्ध नसल्याने त्याने रिफंड करण्याच्या पीडितेचा मोबाइल नंबर घेतला. दुसऱ्या दिवशी, त्याने महिलेच्या मोबाईल नंबरवरून फोन केला आणि तिला रिफंड करण्यासंबंधी माहिती दिली. त्यानंतर, आरोपीने तरुणीला त्रास देण्यास सुरुवात केली. 

हे ही वाचा: चालताना धक्का लागल्याने वाद पेटला! रॉडने बेदम मारहाण करत मुंबईतील रिटायर्ड रेल्वे कर्मचाऱ्याची हत्या...

महिलेच्या व्हॉट्सअॅप नंबरवर अश्लील मॅसेजेस 

पीडितेच्या म्हणण्यानुसार, डिलीव्हरी बॉयने महिलेचा मोबाईल नंबर सेव्ह करून तिला अश्लील मॅसेजेस पाठवण्यास सुरूवात केली. त्यावेळी, पीडितेने त्या मॅसेजेसना रिप्लाय न देता याबाबत तिच्या पतीला तिने सगळं काही सांगितलं. खरं तर, महिलेच्या कुटुंबियांनी आरोपीला त्याचं हे कृत्य थांबवण्यास सांगितलं. मात्र, तरीसुद्धा त्याने पीडितेला त्रास देणं सुरूच ठेवलं. 28 सप्टेंबर रोजी त्याने पुन्हा अश्लील मेसेज पाठवले.  त्यानंतर, महिलेच्या कुटुंबियांनी आरोपीला पुन्हा मेसेज पाठवले तर पोलिस तक्रार दाखल केली जाईल, असं स्पष्टपणे सांगितलं. यावर, आरोपी तरुणाने पीडितेचा नंबर ब्लॉक करणार असल्याचा दावा केला. 

हे ही वाचा: शेजारी राहणाऱ्या तरुणावर लग्नासाठी दबाव... नकार दिल्याने मुलाच्या अपहरणाचा रचला बनाव! नेमकं प्रकरण काय?

पोलिसात तक्रार 

परंतु, 19 नोव्हेंबर रोजी, आरोपीने पुन्हा एका नवीन नंबरवरून महिलेला व्हॉट्सअॅप मॅसेज पाठवले आणि तिला एकट्यात भेटण्यासाठी बोलवलं. महिलेने या सगळ्याला विरोध केल्यानंतर, आरोपीने तिला धमकावण्यास सुरुवात केली. सततच्या छळाला आणि धमक्यांना कंटाळून अखेर, परिनाजने पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. भायखळा पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर नोंदवण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी लवकरच आरोपीला अटक करण्यात येणार असल्याचा दावा केला आहे. 

    follow whatsapp