मुंबईकरांनो सावधान, पावसाची बॅटिंग सुरुच, पुढील 3 तास महत्त्वाचे, IMD चा इशारा

मुंबई तक

03 Jul 2026 (अपडेटेड: 03 Jul 2026, 09:28 AM)

mumbai heavy rain orange alert : मुंबईत मुसळधार पावसाने जनजीवनावर परिणाम झाला असून पुढील तीन तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभाग आणि प्रशासनाने केले आहे.

mumbai heavy rain orange alert

mumbai heavy rain orange alert

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबईकरांनो, पावसाची बॅटिंग सुरुच,

point

पुढील 3 तास महत्त्वाचे, IMD चा इशारा

mumbai heavy rain orange alert : मुंबईत गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत जोरदार पावसाची नोंद झाली आहे. शहरात सुरु असलेल्या तुफान पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांमध्ये पाणी साचल्यामुळे मुंबईकरांना अडचणींचा सामना करावा लागतोय. दरम्यान, मंत्रालयाकडूनही मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतील नागरिकांना पुढील तीन तासांत काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याने सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : नवी मुंबई : 'चुकीचे इंजेक्शन'ने 2 गर्भवती महिलांचा मृत्यू? मनसे आक्रमक अन् पहिली कारवाई

मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता

सततच्या पावसाच्या  पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी पुढील तीन तासांसाठी ऑरेंज वॉर्निंग जारी केली आहे. या कालावधीत काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.  

हेही वाचा : नागराज मंजुळेंच्या ‘खाशाबा’चा नादखुळा टीझर, हिरोच्या भूमिकेनं ताणली उत्सुकता; चित्रपट प्रदर्शनाची तारीख समोर 

कोणत्या भागात किती मीमी पाऊस कोसळला? 

बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, 2 जुलै रोजी सकाळी 8 वाजल्यापासून 3 जुलै रोजी सकाळी 6 वाजेपर्यंतच्या कालावधीत मंडवी अग्निशमन केंद्र परिसरात सर्वाधिक 150.2 मिमी पावसाची नोंद झाली. पूर्व उपनगरांमध्ये पवईतील पासपोली महापालिका शाळा येथे 124 मिमी, मानखुर्द अग्निशमन केंद्र येथे 117.8 मिमी, एस वॉर्ड कार्यालय परिसरात 116.2 मिमी आणि गावणपाडा अग्निशमन केंद्र परिसरात 115.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सततच्या पावसामुळे शहरातील विविध भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत.

अंधेरी सबवेमध्ये पाणी साचले, पण वाहतुकीसाठी खुला 

दरम्यान, सकाळी 6.४० वाजेपर्यंतच्या माहितीनुसार अंधेरी सबवेमध्ये किरकोळ प्रमाणात पाणी साचले होते. मात्र, सबवे वाहतुकीसाठी खुला असून तेथून वाहनांची ये-जा सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. मुंबईत पहाटेपासूनच अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू असून काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रवासादरम्यान विशेष काळजी घेण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये पुढील काही तास पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, तसेच हवामान आणि प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सततच्या पावसामुळे परिस्थितीवर संबंधित यंत्रणांकडून लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पुन्हा करण्यात आले आहे.