माहीम : धक्का लागल्याने चाकू हल्ला, माफी मागूनही विषय मिटला नाही; स्थानकाबाहेर काय घडलं?

Mumbai mahim railway station knife attack : माहीम रेल्वे स्थानकाबाहेर किरकोळ धक्का लागल्याने झालेल्या वादातून 35 वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू केली आहे.

Mumbai mahim railway station knife attack

Mumbai mahim railway station knife attack

मुंबई तक

29 Jun 2026 (अपडेटेड: 29 Jun 2026, 11:38 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

माहीम : धक्का लागल्याने चाकू हल्ला

point

माफी मागूनही विषय मिटला नाही; स्थानकाबाहेर काय घडलं?

Mumbai mahim railway station knife attack : मुंबई लोकलमधील 22 वर्षीय मयंक लोहारचे हत्या प्रकरण ताजे असतानाच, आता पुन्हा एका किरकोळ वादातून चाकूहल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्री सुमारे 10.15 वाजण्याच्या सुमारास माहीम रेल्वे स्थानकाबाहेर नवीन प्रसन्ना (वय 35) यांच्यावर अज्ञात व्यक्तीने चाकूने वार करून गंभीर जखमी केले. या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली असून, माहीम पोलिसांनी अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : वडिलांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर नोकरीची इच्छा, मुलाने थेट 10 लाखांची दिली सुपारी अन्...

माफी मागूनही वाद मिटला नाही 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन प्रसन्ना हे लोअर परळ येथील एका जाहिरात, मनोरंजन आणि तंत्रज्ञान कंपनीत कार्यरत आहेत. ते लोकलने प्रवास करून घरी परतत होते. माहीम रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर फुटपाथवर चालत असताना त्यांचा एका पादचाऱ्याला धक्का लागला. त्यानंतर प्रसन्ना यांनी संबंधित व्यक्तीची माफीही मागितली. मात्र, धक्क्यामुळे आपला मोबाईल खाली पडून खराब झाल्याचा दावा करत आरोपीने प्रसन्ना यांच्याकडे भरपाईची मागणी केली. त्यांनी भरपाई देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने संतापाच्या भरात चाकूने त्यांच्यावर वार केले.

हेही वाचा : 'अपघाताची केस मर्डरची कशी झाली?' सियाचे वकील कोर्टात कोणता युक्तीवाद करणार?

हल्ल्यानंतर तरुण 15 तास बेशुद्ध 

हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून तातडीने पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या नवीन प्रसन्ना यांना स्थानिक नागरिकांनी तातडीने सायन रुग्णालयात दाखल केले. या घटनेबाबत माहिती देताना त्यांचे भाऊ सचिन यांनी सांगितले की, हल्ल्यानंतर त्यांचा भाऊ सुमारे 15 तास बेशुद्ध अवस्थेत होता. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे.

या प्रकरणी माहीम पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात आरोपी अमली पदार्थांच्या आहारी गेलेला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तसेच हल्ल्यानंतर आरोपी रेल्वेने घटनास्थळावरून पळून गेल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.