Mumbai Monsoon : मुंबईसह राज्यभरात पुढील तीन दिवस पावसाची बॅटिंग, वाहतुकीचे महत्त्वाचे अपडेट

मुंबई तक

• 07:22 PM • 04 Jul 2026

Mumbai Monsoon : मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दिवसभर पाऊस दमदार बॅटिंग करताना दिसत आहे. मुंबईच्या रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरुप प्राप्त झालं आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यात ठिकठिकाणी सोसायट्याच्या वाऱ्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांत पावसाने हाहाकार माजवला आहे. 

Mumbai Monsoon News

Mumbai Monsoon News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यभरात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

point

स्थानिक वाहतुक सुविधा ठप्पा असण्याची परिस्थिती

Mumbai Monsoon : मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दिवसभर पाऊस दमदार बॅटिंग करताना दिसत आहे. मुंबईच्या रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरुप प्राप्त झालं आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यात ठिकठिकाणी सोसायट्याच्या वाऱ्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांत पावसाने हाहाकार माजवला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : बायकोनं नवऱ्याची हत्या करून मृतदेह बाथरूम खोदून लपवला, दीरानं पितळ उघडं पाडलं

राज्यभरात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

4 ते 6 जुलैदरम्यान मुंबईसह राज्यभरात दमदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे. तसेच सातारा, पुणे आणि नाशिकच्या घाट परिसरातही या तारखेदरम्यान हलका ते पावसाचा जोर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. स्थानिक वाहतुक सुविधा ठप्प झाली आहे, तसेच रेल्वे सुविधा देखील संत गतीने सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. 

स्थानिक वाहतुक सुविधा ठप्पा असण्याची परिस्थिती

याच काळात स्थानिक वाहतुक सुविधा ठप्पा होताना दिसत आहेत. काही प्रमाणात संरचनात्मकपणे नुकसान होण्याची शक्यता असल्याचा अधिकाऱ्यांनी इशारा दिला. नागरिकांनी घाट परिसर, सखल भागातून प्रवास करताना सतर्क राहण्याचा सल्ला दिला. 

राज्याच्या अपत्ती विभागाने रहिवाशांना सावधानता बाळगण्याचे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास स्थानिक आपत्कालीन हेल्पलाइनच्या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते. असातच पुढील तीन दिवस हे मान्सूनच्यादृष्टीने महत्त्वाचे आहेत. 

हे ही वाचा : पुण्याची गोष्ट : मिसिंग लिंकचे दोन महिन्यापूर्वी उद्घाटन, पहिल्याच पावसात ठिकठिकाणी खड्डे

पुढील काही तास हे मुंबई आणि परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग होणार राहण्याची शक्यता आहे. अनेक ठिकठिकाणी भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता जाणवेल, काही तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.