Mumbai Monsoon : मुंबईत पावसाची धुव्वादार बॅटिंग, चार दिवसांत तिघांचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई तक

• 03:07 PM • 04 Jul 2026

Mumbai Monsoon : राज्यभरात पावसाने हाहाकार माजवला आहे, या पावसामुळे राज्यभरातील काही रस्त्याला नदी नाल्याचे स्वरुप प्राप्त झालं आहे. मुंबईतही पावसाने थैमान घातलं आहे. गेल्या चार दिवसांत मुंबईत 3 बळी पडले आहेत.  यामुळे स्थानिक प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Mumbai Monsoon

Mumbai Monsoon

Google CTA

बातम्या हायलाइट

point

डोंबिवलीत महिलेचा मृत्यू 

point

मीरा भाईंदरमध्ये दुचाकीवर झाड कोसळलं

point

साकीनाका परिसरात मॅनहोलमध्ये एकाचा पडून दुर्दैवी मृत्यू

point

चार दिवसांत तिघांचा मृत्यू

Mumbai Monsoon : राज्यभरात पावसाने हाहाकार माजवला आहे, या पावसामुळे राज्यभरातील काही रस्त्याला नदी नाल्याचे स्वरुप प्राप्त झालं आहे. मुंबईतही पावसाने थैमान घातलं आहे. गेल्या चार दिवसांत मुंबईत 3 बळी पडले आहेत.  यामुळे स्थानिक प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मीरा भाईंदर, चेंबूर आणि साकीनाका परिसरात तिघांचा दुर्दैवी अपघात होऊन मृत्यू झाला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Astrology : चातुर्मास सुरू होताच, 'या' राशींचे भाग्य उजळून निघेल

मुंबईत झाड कोसळलं, साकीनाका परिसरात मॅनहोलमध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू, डोंबिवलीत खाऊ आणण्यास गेलेल्या आईचा विजेच्या झटक्याने मृत्यू, या घटना मागील चार दिवसांतील आहेत. या घटनेनं मुंबईकरांच्यात एक संतप्ततेची भावना निर्माण झाली. 

डोंबिवलीत महिलेचा मृत्यू 

डोंबिवलीतील हनुमान नगर परिसरात राहणाऱ्या राशी चक्र (वय 42) या महिलेचा विजेच्या तारेला संपर्क आल्याने विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. मुसळधार पाऊस सुरू असताना आपल्या दोन मुलांना खाऊ आणण्यासाठी घराबाहेर पडल्या असताना ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेनं महावितरणाचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आल्याचे सांगण्यात येते. 

मीरा भाईंदरमध्ये दुचाकीवर झाड कोसळलं

मीरा भाईंदरमध्ये एका दुचाकीवर झाड कोसळलं, ज्यात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.  हा धक्कादायक प्रकार महानगरपालिका प्रभाग क्रमांक 10 मधील गोल्ड नेस्ट परिसरात मुसळधार पावसाने वृक्ष अचानकपणे दुचाकीस्वारावर कोसळले. त्यानंतर त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू ठेवण्यात आले होते, मात्र त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

हे ही वाचा : 'तुमच्या संवेनशीलतेबद्दलच शंका...' अमित साटम फिदीफिदी हसले, राज ठाकरेंनी फडणवीसांना सुनावलं

साकीनाका परिसरात मॅनहोलमध्ये एकाचा पडून दुर्दैवी मृत्यू

तसेच साकीनाका परिसरात एका 25 ते 30 फूट खोल मॅनहोलमध्ये एकाचा पडून दुर्दैवी मृत्यू झाला. मृत व्यक्तीची अस्लम इसाक शेख अशी ओळख समोर आली.  ही दुर्दैवी घटना 2 जुलै 2026 रोजी गुरुवारी घडली आहे, या घडलेल्या घटनेनं स्थानिक प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.