Mumbai Metro: मुंबईत मेट्रो 3 (Aqua Line) सुरू होऊन तीन महिने झाले आहेत. मात्र, तरीसुद्धा प्रवाशांना अजून 'नो नेटवर्क'च्या समस्येचा सामना करावा लागत आहे. या मेट्रोचं उद्घाटन करतेवेळी लवकरात लवकर या मेट्रो लाइनवर मोबाईल नेटवर्क मिळणार असल्याचं आश्वासन करण्यात आलं होतं. परंतु, या मेट्रो सेवेला तीन महिने उलटूनही नवीन वर्षात काही सिम कार्ड्सना अद्याप नेटवर्क मिळालं नाही. यामागचं नेमकं कारण काय?
ADVERTISEMENT
MMRCL ने मेट्रो लॉन्च करतेवेळी सबवेवर नेटवर्कची सुविधा देण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु, वरळी आणि कुलाबा दरम्यान असलेल्या स्थानकांवर प्रवाशांना नेटवर्क ब्लॅकआउटच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. या मुद्द्यावर टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्स आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) यांच्यात वाद सुरू आहे.
प्रवाशांना 'नो नेटवर्क' ही समस्या
आता मेट्रो लाइनच्या काही भागांमध्ये केवळ व्होडाफोन आयडिया (Vi) आणि BSNL ला कनेक्टिव्हिटी मिळत आहे. मात्र, जिओ आणि एअरटेल प्रवाशांना मेट्रोच्या संपूर्ण मार्गिकेवर 'नो नेटवर्क' ही समस्या उद्भवत असते. आरे ते आचार्य अत्रे चौक (वरळी) स्थानकांपर्यंत नेटवर्क कनेक्टिव्हिटी असल्याचा दावा व्हीआयने केला आहे. परंतु, कस्टमर्स वरळी आणि कफ परेड दरम्यान नेटवर्क समस्यांची तक्रार करत आहेत. विशेष बाब म्हणजे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (NMIA) अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.
हे ही वाचा: मित्रावर नको तितका विश्वास ठेवला अन् त्यानेच केला घात! पीडितेचे अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड करून तिच्याच भावाला पाठवले अन्...
MMRCL ने अॅक्वा लाइनसाठी ACES इंडिया लिमिटेडसोबत पार्टनरशिप केली आहे. परंतु, टेलिकॉम कंपन्यांचा आरोप आहे की ACES नेटवर्क डिप्लॉयमेंटसाठी अत्यधिक दर आकारत आहे. यासाठी बऱ्याच मीटिंग होऊनही, कोणताही उपाय सापडला नाही आणि काही मेट्रो प्रवाशांना अजूनही नेटवर्कची सुविधा मिळून शकत नाहीये. एका प्रमुख टेलिकॉम ऑपरेटरच्या सूत्रांनुसार, ACES 118 कोटीं रुपयांचा कॅपिटल खर्च (कॅपेक्स) असल्याचा दावा केला आहे. तसेच, टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्स (टीएसपी) च्या अंतर्गत अंदाजानुसार, हा खर्च फक्त 30 कोटी असावा.
हे ही वाचा: मुंबई विमानतळावर येताच लंडनच्या डॉ. संग्राम पाटलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं, FIR मध्ये नेमकं काय?
सूत्रांच्या माहितीनुसार, सुरूवातीला मुंबई मेट्रो आणि त्यांचे वेंडर म्हणजेच विक्रेते प्रति स्थानक 13 लाख रुपयांची मागणी करत आहेत. त्यानंतर, हे शुल्क प्रति स्थानक 5.5 लाख रुपये करण्यात आलं. तसेच, TSP च्या अंतर्गत गणनेनुसार, प्रत्येक स्थानकावर दरमहा 39,000 रुपयांचा भांडवली खर्च आणि त्यावर 10 टक्के मॅनेजमेंट फी देण्याची अपेक्षा आहे. या आर्थिक वादामुळे, अंडरग्राउंड मेट्रोमधील नेटवर्कची समस्या अजूनही सुटलेली नाही आणि याचा थेट परिणाम प्रवाशांवर होत आहे.
ADVERTISEMENT











