मुंबईची खबर: Veg आणि Non Veg एकाच किचनमध्ये बनवणाऱ्या हॉटेल मालकांची लागणार वाट!

अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तांनी हॉटेल आणि अन्न व्यावसायिकांना शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ पूर्णपणे वेगवेगळे बनवण्याचे आदेश दिले आहेत. नियमांचं पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.

Veg आणि Non Veg एकाच किचनमध्ये बनवणाऱ्या हॉटेल मालकांवर कारवाई

Veg आणि Non Veg एकाच किचनमध्ये बनवणाऱ्या हॉटेल मालकांवर कारवाई (प्रातिनिधिक फोटो)

मुंबई तक

14 Jun 2025 (अपडेटेड: 14 Jun 2025, 02:50 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ वेगळे बनवण्याचे निर्देश

point

अन्न सुरक्षा प्रशासनाच्या आयुक्तांचे हॉटेल व्यावसायिकांना आदेश

point

नियमांचं पालन न केल्यास कठोर कारवाई

Mumbai News: अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे नवे आदेश समोर आले आहेत. आदेशानुसार, शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ बनवण्याची प्रक्रिया आणि त्याची तयारी पूर्ण वेगळी असायला हवी. इतकेच नव्हे तर हे पदार्थ बनवण्यासाठीची पूर्वतयारी आणि त्यांची साठवणूक सुद्धा वेगवेगळी करण्याचे निर्देश अन्न व औषध विभागाचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. प्रशासनाच्या नियमांचं पालव न करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकावर दंड आकारणे तसेच परवाना रद्द करुन कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

हे वाचलं का?

अन्न सुरक्षेबाबत प्रशिक्षण

अन्न प्रशासन विभागातर्फे राज्यातील 30 हजार अन्न विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांना अन्न सुरक्षेबाबत प्रशिक्षण देण्यात आलं आहे. तसेच, यावर्षी सुद्धा 1 लाख व्यावसायिकांना प्रशिक्षण देण्याचं नियोजन आखण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. 

नियमांचं पालन न केल्यास...

प्रत्येक अन्न व्यावसायिकाने अन्न सुरक्षेबाबत जागृत राहण्यासाठी या नियमांचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व हॉटेल आणि अन्न व्यावसायिकांनी या नियमांचं पालन करणं अत्यावश्यक आहे. अन्न सुरक्षा ही ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. 

हे ही वाचा: नेत्यासोबत भररस्त्यात शारीरिक संबंध, व्हायरल व्हिडिओमधील महिलेचे कॉल डिटेल्स पोलिसांच्या हाती!

अन्न सुरक्षा आणि मानके कायदा

अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, 2006 अंतर्गत 2011 च्या अनुसूची 4 मध्ये भारतीय अन्न व्यावसायिकांसाठी सुरक्षा आणि स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून वेगवेगळ्या पद्धती नमूद केल्या आहेत. त्यामध्ये  स्ट्रीट फूड विक्रेते आणि इतर बिगर-उत्पादक अन्न युनिट्सनी शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचे काटेकोरपणे विभाजन करावे, असं सांगण्यात आलं आहे. "शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची तयारी, प्रक्रिया आणि स्वयंपाक वेगळे केले पाहिजे." असं देखील त्यात सांगितलं आहे. 

हे ही वाचा: पुण्यात वाहनचालकाने गाठला बेशिस्तपणाचा कळस, विनापरवाना कार फुटपाथवर चढवली अन् तरुणीला ठोकर देत संपवलं

आयुक्तांचं आवाहन 

राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट्समध्ये तपासणी केल्यावर या नियमांचं पालन करण्यात दोषी आढळलेल्या व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं आयुक्तांनी म्हटलं. तसेच, अन्न भेसळीसंबंधी सामान्य नागरिकांनी देखील हेल्पलाइन किंवा 'फूड सेफ्टी कनेक्ट अॅप'च्या माध्यमातून तक्रार नोंदवण्याचे आवाहन आयुक्तांकडून करण्यात आले आहेत. 

    follow whatsapp