मुंबई: धार्मिक विधी करण्याच्या बहाण्याने पीडितेला हॉटेलमध्ये नेलं अन् बलात्कार! नंतर, अश्लील फोटोंच्या आधारे ब्लॅकमेल...

दक्षिण मुंबईत एका 35 वर्षीय घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार आणि त्यानंतर, तिला ब्लॅकमेक करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

अश्लील फोटोंच्या आधारे ब्लॅकमेल...

अश्लील फोटोंच्या आधारे ब्लॅकमेल...

मुंबई तक

• 04:57 PM • 11 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

धार्मिक विधी करण्याच्या बहाण्याने पीडितेला हॉटेलमध्ये नेलं अन् बलात्कार!

point

नंतर, अश्लील फोटोंच्या पीडितेला आधारे ब्लॅकमेल...

Mumbai News: दक्षिण मुंबईत एका 35 वर्षीय घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार आणि त्यानंतर, तिला ब्लॅकमेक करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी संबंधित प्रकरणातील आरोपीला अटक केल्याची माहिती आहे. आरोपी तरुण हा विवाहित असून तो ड्रायव्हर म्हणून काम करत असल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित आरोपी ज्या मालकाची गाडी चालवत होता, त्या मालकाच्या घरात पीडिता घरकामासाठी यायची. पीडित तरुणी आणि आरोपी दोघेही बिहारचे रहिवासी असल्याने दोघांमध्ये चांगली ओळख झाली आणि तरुणीसोबत हे भयानक कृत्य घडलं. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे. 

हे वाचलं का?

धार्मिक विधी करण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये नेलं अन्...

एमआरए पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2024 मध्ये आरोपी तरुण धार्मिक विधी करण्याच्या बहाण्याने पीडितेला फोर्ट परिसरातील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथे, आरोपीने पीडित तरुणीला मादक पदार्थ मिसळून पेय प्यायला दिलं. त्यानंतर, पीडिता बेशुद्ध पडली आणि त्याच अवस्थेत आरोपी तरुणाने तिच्यासोबत घाणेरडं कृत्य केलं. 

हे ही वाचा: बाप मुलासोबत पोरगी बघायला गेला अन् वडिलांना मुलीची आईच पसंत पडली! नंतर, घडला विचित्र प्रकार...

पीडितेवर बलात्कार अन् अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल 

इतकेच नव्हे तर, आरोपीने आपल्या मोबाईल फोनमध्ये पीडितेचे प्रायव्हेट आणि अश्लील फोटो काढले. या घटनेनंतर, आरोपी पीडितेच्या त्या फोटोंच्या आधारे तिला सतत धमक्या द्यायचा. तरुणीच्या अश्लील फोटोंच्या आधारे आरोपी तिला नेहमी ब्लॅकमेल करत तिला वेगवेगळ्या ठिकाणी न्यायचा आणि तिथे पीडितेसोबत घृणास्पद कृत्य करायचा. अखेर, पीडिता आरोपीच्या या घाणेरड्या वागण्याला वैतागली. तिने पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: मुंबईत बनणार 70 किमी लांब अंडरग्राउंड रोड नेटवर्क! कसं असेल कनेक्शन?

पोलिसांचा तपास 

पीएसआय अनिल राठोड आणि पीएसआय वासंती जाधव यांच्या नेतृत्वाखाली एमआरए मार्ग पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीच्या आधारे संबंधित प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करून आरोपीला बालेश्वर येथून अटक केली. आरोपी तरुणाकडून एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून पोलिसांनी तो फॉरेन्सिक तपासासाठी पाठवला आहे. आता आरोपी तरुणाने इतर कोणत्या महिलेसोबत असं घृणास्पद कृत्य केलं आहे का? याचा पोलीस तपास करत आहे. 

    follow whatsapp