Mumbai Crime: लंडनमध्ये नोकरी आणि युनायटेड किंगडम (UK) चा व्हिसा मिळवून देण्याच्या नावाखाली मुंबईत राहणाऱ्या एका जोडप्याची 27 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिला आणि पुरुषाने मिळून पीडित जोडप्याची मोठी फसवणूक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकांक्षा राजेंद्र तिवारी अशी आरोपी महिलेची ओळख समोर आली असून तिला अटक करण्यात आली आहे. आता पोलीस तिच्यासोबत असलेल्या आरोपी पुरुषाचा शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT
सोशल मीडियावर मिळाली कंपनीची माहिती
इंजीनियरिंग कंसल्टेंट म्हणून कार्यरत असलेल्या विकास विदुर कुमार खतिवेदा यांनी कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये प्रकरणासंदर्भात तक्रार नोंदवली. पीडित तरुण म्हणाला की त्याची पत्नी मोनिका दहल हिला लंडनमध्ये काम करायचं होतं. त्यानंतर, त्यांनी मुंबईतच नोकरी आणि व्हिसा मिळवून देण्यासाठी काम करणाऱ्या एजन्सीचा शोध घेण्यास सुरूवात केली. दरम्यान, पीडित जोडप्याला सोशल मीडियावर अशा एका खाजगी कंपनीची माहिती मिळाली.
संबंधित कंपनीने यूके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि इतर देशांसाठी नोकऱ्या तसेच व्हिसा सर्व्हिस पुरवण्याचा दावा करणाऱ्या अनेक स्टोरीज पोस्ट केल्या होत्या. पोलिसांच्या माहितीनुसार, दिलेल्या नंबरवर जोडप्याने संपर्क साधला आणि त्यांची ओळख आरोपी आकांक्षा तिवारीसोबत झाली.
आरोपींच्या खात्यात 27 लाख रुपये पाठवले
दाखल केलेल्या एफआयआरनुसार, कांदिवलीच्या रघुलीला मॉलमधील एका कार्यालयात आरोपी आकांक्षासोबत पीडितांची भेट झाली. त्यावेळी, रोहित सोंगरा नावाची व्यक्ती संबंधित कंपनीची मालक असल्याचा दावा करण्यात आला. अखेर, जोडप्याने विश्वास ठेवून रोहित आणि आकांक्षाच्या सांगण्यावरून जून 2024 ते मे 2025 या कालावधीत जवळपास 27 लाख रुपये आरोपींच्या खात्यात पाठवले.
हे ही वाचा: सॉरी मम्मी, माझी बॉडी दान करा, शौर्य पाटीलची मेट्रो स्टेशनवरुन उडी मारुन आत्महत्या, धक्कादायक कारण समोर
या काळात, आरोपींनी जोडप्याला वारंवार आश्वासने दिली. मात्र तरीसुद्धा मोनिका आणि तिच्या पतीला परदेशात नोकरीसाठी व्हिसा मिळाला नाही. काही काळानंतर, आरोपींनी पीडितांची उत्तरं देण्यासाठी टाळाटाळ सुरूवात केली. दरम्यान, कंपनीचं कांदिवली येथील कार्यालय बंद करण्यात आलं असून ते मालाड परिसरात स्थलांतरित झाल्याची पीडित जोडप्याला माहिती मिळाली. त्यानंतर, मालाडच्या कार्यालयात शोध घेण्यासाठी गेल्यानंतर, आरोपी तिथे सापडले नाहीत.
हे ही वाचा: नोकरीसाठी आई बनली कसाई, 20 दिवसांचं बाळ झोपलेलं असताना वैनगंगा नदीच्या पूलावरुन फेकलं, संपूर्ण परिसर सुन्न
फसवणूक झाल्याचं लक्षात येताच गुन्हा दाखल
अखेर, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित पतीने कांदिवली पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपी आकांक्षा तिवारी आणि सोंगरा यांच्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून आरोपी महिलेला सुद्धा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आता, पोलीस उर्वरित आरोपीचा शोध घेत असल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT











