Mumbai News: मुंबईच्या वाढत्या लोकसंख्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या संख्येत देखील वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईतील जवळपास प्रत्येक नागरिकासाठी कामानिमित्त लोकल ट्रेनने प्रवास करणं सोयीचं वाटतं. वसई-विरार आणि कर्जत-खोपोली मार्गावर लोकल ट्रेनची संख्या कमी असल्याकारणाने तिथल्या स्थानिकांना ट्रेनमधून प्रचंड गर्दीत प्रवास करावा लागतो.
ADVERTISEMENT
पनवेल-बोरीवली-वसई उपनगरीय कॉरिडॉर
नियमित लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी दिलासाजनक बातमी समोर आली आहे. पनवेल-बोरीवली-वसई उपनगरीय कॉरिडॉर प्रोजेक्टला ग्रीन सिग्नल मिळाल्याचं सांगितलं जात आहे. नवी मुंबई ते बोरीवली आणि वसईमार्गे पनवेल स्टेशन विरारला जोडणाऱ्या एका लाइनची निर्मिती करण्यात येणार आहे. मागील कित्येक वर्षांपासून या रूटची मागणी केली जात होती. अखेर, बऱ्याच प्रतिक्षेनंतर या रूटची लवकरच बांधणी केली जाणार आहे.
हे ही वाचा: Thackeray Brother: उद्धव ठाकरे 'या' नेत्याला सोबत घेऊन अचानक का गेले राज ठाकरेंच्या घरी?, 'शिवतीर्थ'वर बंद दाराआड कोणत्या चर्चा?
एकूण 12710.82 रुपये खर्च
पनवेल-बोरीवली-वसई कॉरिडॉर बांधण्यासाठी एकूण 12710.82 रुपये खर्च येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ही लोकल लाइन मुंबई शहरी वाहतूक योजना (MUTP-3 B) अंतर्गत बांधली जाणार आहे. पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी प्रदान करून लोकल ट्रेनची गर्दी काही प्रमाणात कमी करण्याचा पनवेल-बोरीवली-वसई मार्गिकेचा उद्देश आहे.
69. 23 किलोमीटर लांब
ही बोरीवलीच्या एका टोकावर आणि वसईच्या एका टोकावर दोन्ही बाजूंनी लाइन असेल. 69. 23 किलोमीटर लांब असलेली ही उपनगरीय रेल्वे लाइन अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. सध्याच्या, पनवेल-दिवा-वसई मार्गिकेप्रमाणेच, ही नवी मार्गिका किंवा कॉरिडॉर पनवेल-कर्जत मार्गिकेप्रमाणे, स्वतंत्र पद्धतीने चालेल. यामुळे कनेक्टिव्हिटी अधिक चांगली होईल तसेच प्रवाशांसाठी गर्दी कमी करण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे.
हे ही वाचा: "बागेत चल नाहीतर व्हिडीओ व्हायरल..." तरुणांनी मुलीसोबत केलं अश्लील कृत्य अन् पीडितेच्या मित्राला सुद्धा...
MUTP-3 B अंतर्गत बदलापुर आणि कर्जत दरम्यान तिसरी लाइन तसेच आसनगाव आणि कसारा दरम्यान चोथ्या लाइनचं देखील काम सुरू आहे. या सर्व मार्गांवर एकूण 14907.47 करोड खर्च केला जाणार असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
