विरारमध्ये जीर्ण झालेली इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली आईसह लेकीचा मृतदेह, क्षणार्धात अनेक कुटुंबं हरपली

Virar Building Collapes : पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये इमारत कोसळल्याने मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. रेस्क्यू अद्यापही थांबलेली नाही.

Virar Building Collapes

Virar Building Collapes

मुंबई तक

• 10:24 AM • 28 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये इमारत कोसळली

point

आई आणि मुलीसह 12 जणांचा मृत्यू

Virar Building Collapes : पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये (विरार नारंगी) रमाईनगर अपार्टमेंट ही चार मजली इमारत शेजारील इमारतीवर कोसळल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली. इमारत कोसळल्याने आई आणि मुलीसह 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच एकूण मिळून मृतांच्या आकड्यातील वाढ ही 15 वर गेली आहे. ही घटना मंगळवारी रात्री 12.05 वाजचा घडली. या घटनेनं पालघर विरार हादरून गेलं आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 30 ऑगस्ट पासून बुध ग्रहाचे केतू नक्षत्रात संक्रमण, काही राशीतील लोकांवर पैशांचा पाऊस पडणार

रेस्क्यू ऑपरेशन सुरुच

ही एकूण संवेदनशील घटना पाहता, 30 तासांपासून एनडीआरएफच्या 5 व्या बटालियनच्या 2 पथकांकडून घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. या अपघातात इमारीतीच्या ढिगाऱ्याखालून एकूण 15 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर यातील एक जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. तर यापैकी दोघेजण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. 

सात मृतांची ओळख पटली

एनडीआरएफ घटनास्थळी दाखल होण्यापूर्वी स्थानिक नागरिकांनी आपली धाडसी वृत्ती दाखवून 7 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवले. सध्या ढिगारा हटवण्याचे काम सुरु आहे. आरोही ओंकार जोविल (24), त्यांची एक वर्षाची मुलगी उत्कर्षा जोविल, लक्ष्मण किस्कू सिंग (26), दिनेश प्रकाश सपकाळ (43), सुप्रिया निवाळकर (38), अर्णब निवाळकर (11) आणि पार्वती सपकाळ अशी आतापर्यंत सात मृतांची ओळख पटल्याचे वृत्त आहे. तसेच मृतांच्या संख्येत आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाज बांधण्यात येत आहे. 

हे ही वाचा : रायगड आणि रत्नागिरीत जोरदार पावसाची शक्यता, तर 'या' ठिकाणी येलो अलर्ट

पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम म्हणाले की, सुदैवाने चाळीवर इमारत कोसळली ती रिकामीच होती. त्यांनी सांगितलं की, खबरदरी म्हणून इमारतीच्या आजूबाजूला असलेल्या सर्व चाळ रिकाम्या करण्यात आल्या आहेत. तसेच रहिवाशांना सुरक्षित स्थळी पाठवले आहे. 

 

    follow whatsapp