Gautami patil Statement : गौतमी पाटील ही नेहमी तिच्या नाच गाण्यासाठी चर्चेत असते. पण, आता ती एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील बंगळुरु राष्ट्रीय महामार्गाजवळ गौतमीच्या कारने रिक्षाला धडक दिल्याने रिक्षाचा चेंदामेंदा झाला. या अपघातात रिक्षा चालक सामाजी मरगळे गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणात भाजप नेते आणि उच्च व तंत्र शिक्षक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना फोनद्वारे संपर्क साधत गौतमी पाटीलला उचला अशी मागणी केली. त्यानंतर आता गौतमी पाटीलची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : लग्नाचं आमिष दाखवून शरीरशोषण, लग्न दुसरीसोबत, मावशीचे भाच्यावरच धक्कादायक आरोप, नेमकं प्रकरण काय?
काय म्हणाली गौतमी पाटील?
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराबाहेर नृत्यांगणा गौतमी पाटील विरोधात आंदोलन केलं जात आहे. गनिमी कावा संघटनेकडून हे आंदोलन करण्यात आले. तेव्हा गौतमी पाटीलच्या फोटोला जोडे मारण्यात आले. यानंतर गौतमी पाटीलने पहिली प्रतिक्रिया दिली की, माझ्याकडून असं काहीही झालं नाही की, पोलिसांनी जे सांगितलं आणि मी ते केलं नाही. मी सर्व काही केलं, गाडीचे डॉक्युमेंट्स दिले आहेत. तेव्हा मी कुठे होती याबाबत सर्व माहिती पोलिसांना दिली होती. मला नाही वाटत की सर्वांना काही सांगावं जे लिगली आहे ते मी माझ्या पद्धतीने करतीये. जे चाललंय ते चाललंय, अशी गौतमीने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
गौतमी पाटीलच्या वाहनाचा मुंबई बंगळूरू महामार्गावरील वडगाव पुलाजवळ अपघात झाला होता. या अपघातात गौतमी पाटीलच्या वाहन चालकाने घटनास्थळावर उभ्या असलेल्या रिक्षाला जोरदार धडक दिली होती. या धडकेत रिक्षाचं नुकसान झालं असून रिक्षा चालकांसह 3 जण जखमी झाले होते. हे प्रकरण सिंहगड रोड पोलीस हाताळत असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेनंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी गौतमी पाटीलला उचलायचं की नाही? असा प्रश्न केला होता.
हे ही वाचा : विरारमधील 18 मजली इमारतीत आढळले विद्यार्थ्यांचे मृतदेह, आत्महत्या की हत्या? पालक म्हणाले, 'आमची मुलं कधीच...'
नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
उच्च व तंत्र शिक्षक मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, एका व्हिडिओमध्ये चंद्रकांत पाटील एका डीसीपीला गौतमीला उचलायचं की नाही? असा प्रश्न करत होते. त्यानंतरच हे प्रकरण आणखी तापल्याचं दिसून आलं.
ADVERTISEMENT
