पुणे: पर्यावरण सस्टेनेबिलिटी आणि कम्युनिटी इम्पॉवरमेंट च्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकत, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) आणि स्वयंसेवी संस्था पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन यांच्या सहकार्याने मिर्चीने ग्रीन योद्धा मोहिम राबवली – पुण्यातील वाखाणण्याजोग्या प्रतिसादात पूर्ण ही केली.
ADVERTISEMENT
ही मोहिम युनायटेड नेशन्सच्या २०२५ च्या – “प्लास्टिक प्रदूषणावर मात करा” – या थीमशी सुसंगत होती. ज्यात प्लास्टिक व इलेक्ट्रॉनिक कचरा कमी करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग, कलेक्शन ड्राइव आणि शहरभर जनजागृती उपक्रम यावर फोकस होता. मोहिमेचा शेवट दोन महत्वाच्या गोष्टींनी झाला.
• मोहिमेदरम्यान जमा केलेल्या रिसायकल्ड प्लास्टिकपासून 40 पेक्षा अधिक सार्वजनिक बाकडे बसविण्यात आले.
• जमा केलेल्या ई-कचऱ्याच्या रिफर्बिश आणि रिसायकल्ड इ-वेस्टपासून तयार केलेले 100 संगणक शहरातील दुर्लक्षित शाळांना दान करण्यात आले.
जे एका प्लास्टिक जमा करणं आणि वागणुकीतील बदलाच्या मोहिमेसारखं सुरु झालं, ते एका सर्क्युलर इकॉनॉमीचा पुरावा ठरलं. हे बाकडे, जे आता सार्वजनिक बागांमध्ये आणि शाळांमध्ये बसवले आहेत, पर्यावरणीय जबाबदारी आणि नागरिकांनी पुढाकार घेतलेली कृती याचं कायमचं प्रतीक बनली आहेत.
जमा केलेल्या ई-वेस्टपासून तयार केलेले हे 100 संगणकांचं वाटप, सरकारी आणि गरजू शाळांमध्ये करण्यात आलं, जेणेकरून ज्या मुलांकडे पूर्वी मूलभूत सुविधा नव्हत्या त्यांना डिजिटल शिक्षण उपलब्ध होईल.
“ही मोहीम हे सिद्ध करते की, जेव्हा समाज, कॉर्पोरेशन्स आणि बदल घडवून आणण्याच्या विचारांचे एकत्र येतात, तेव्हा काय साध्य होऊ शकतं,” असं MNGL च्या प्रवक्त्याने सांगितलं.
“प्रदूषणाचा प्रश्न हाताळतानाच आयुष्यं सुधारण्यासाठी डिजिटल समावेशन घडवून आणणाऱ्या या चळवळीला समर्थन देताना आम्हाला अभिमान वाटतो.”
एक्झिक्युशन बद्दल बोलताना, पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशनचे डॉ.राजेश मणेरीकर म्हणाले, “रीसायकलिंग म्हणजे केवळ कचऱ्याचं व्यवस्थापन नव्हे — ते म्हणजे वस्तूंच्या उपयोगाचा पुनर्विचार. प्लास्टिकपासून बाकडे, ई-वेस्टपासून शिक्षण — ही मोहीम दाखवते की सस्टेनेबिलिटी कशी समावेशक आणि सत्यात उतरणारी असू शकते.”
प्लास्टिक योद्धा मोहिमेत नागरिक, विद्यार्थी, रहिवासी संघटना, आणि पर्यावरण स्वयंसेवक यांचा उत्स्फूर्त सहभाग होता, ज्यांनी घराघरातून, कॅम्पस मधून आणि शहराच्या प्रत्येक भागातून कचरा गोळा केला. मोहिमेत शाळांना भेटी देणं, स्वच्छता मोहिमा, आणि जनजागृती करणं देखील होतं — ज्यामुळे सहभाग आणि सवयी बदलणं हे दोन्ही साध्य झालं.
ही बाकडी बसवणं आणि संगणक वाटप करणं हा शेवट नाही — ती बदलाची सुरुवात आहे. एक बदल, जो हेतूपूर्वक केला जातो, सहभागाने बळकट होतो आणि लोकांच्या प्रयत्नाने शक्य होतो.
ADVERTISEMENT
